Mahabharat : आधी शरीराला यायचा माशाचा वास, मग पांडवांची पणजी सत्यवती सुगंधित कशी झाली?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mahabharat Story : महाभारताची कथा ज्या स्त्रीपासून सुरू होते ती सत्यवती, पांडवांची पणजी. अत्यंत सुंदर स्त्री सत्यवतीच्या जन्माची कथा मात्र विचित्र आहे.
नवी दिल्ली : महाभारतातील हस्तिनापूरचा राजा शंतनूची पत्नी, चित्रांगद आणि विचित्रवीर्यची आई, पांडू आणि धृतराष्ट्रची आजी तर पांडव आणि कौरवांची पणजी, सत्यवती. महाभारताची कथा ज्या स्त्रीपासून सुरू होते ती सत्यवती आहे. तिच्या जन्माची कहाणीही विचित्र आहे. तिचा जन्म नदीत पडलेल्या वीर्यापासून झाला होता. अत्यंत सुंदर सत्यवतीबद्दल आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे तिच्या शरीरातून माशाचा वास येत होता, मग असं काही झालं की तिच्या शरीरातून माशाचा वासच नाहीसा झाला, तर एक मोहक सुगंध येऊ लागला, जो दूरवर पसरला.
त्यावेळी चेदी नावाचा एक देश होता, ज्याचा राजा पुरू वंशातील उपरिचर वासू होता. उपरिचर हा इंद्राचा मित्र होता. तो त्याच्या विमानातून आकाशात प्रवास करत असे, म्हणूनच त्याचं नाव उपरिचर पडलं. उपरिचराच्या राजधानीजवळ शुक्तिमात नावाची एक नदी होती. एके दिवशी राजा शिकारीला गेला. मग त्याला त्याची सुंदर पत्नी गिरिका आठवू लागली. यामुळे तो कामोत्तेजित झाला. तेव्हा त्याचं वीर्यस्खलन झालं. त्याने ते गरुडाला देऊन त्याच्या पत्नीला द्यायला सांगितलं.
advertisement

नदीत पडलं वीर्य, मासा प्रेग्नंट
गरुड ते घेऊन उडत तेव्हा वाटेतच त्याच्यावर हल्ला झाला आणि वीर्य नदीत पडलं. त्यावेळी अद्रिका नावाची एक अप्सरा नदीत राहत होती. ब्रह्मदेवाच्या शापामुळे ती माशात बदलली होती. नदीत पडलेलं हे वीर्य तिनं सेवन केलं आणि ती गर्भवती झाली.
advertisement
त्यानंतर एका मच्छीमाराने जाळं टाकलं. एक मोठा मासा त्याच्या जाळ्यात अडकला, हा मासा म्हणजे अद्रिकाच होती. मच्छीमाराला माशाच्या पोटात एक मुलगा आणि एक मुलगी आढळली. त्यानंतर अप्सरा शापातून मुक्त झाली आणि आकाशात गेली. तर मच्छिमार दोन्ही मुलांना घेऊन राजा उपरिचरकडे गेला. राजाने मुलाला दत्तक घेतलं, जो नंतर मत्स्य नावाचा धार्मिक राजा बनला. तर मुलगी मच्छिमाराला दिली.
advertisement
मुलीच्या शरीरातून माशाचा वास
मुलगी जसजशी मोठी होत गेली तसतशी ती अधिकाधिक सुंदर होत गेली. ती मच्छिमारांच्या वसाहतीत मच्छीमारांसोबत राहत असल्याने तिचं नाव मत्स्यगंधा ठेवण्यात आलं. तिचं दुसरे नाव योजगंधा होतं. माशाच्या पोटातून जन्म झाल्यामुळे तिच्या शरीराला माशासारखा वास येत होता. नंतर तिच्या शरीरातून एक मोहक वास येऊ लागला, यामागेही एक कथा आहे.
advertisement

माशाचा वास मोहक सुगंधात कसा बदलला?
मत्स्यगंधा लोकांना नावेतून यमुना ओलांडून घेऊन जात असे. एके दिवशी ऋषी पराशर तिथे पोहोचले. ऋषींना यमुना ओलांडायची होती. ते मत्स्यगंधाच्या नावेत बसले. या काळात त्यांनी सत्यवतीला सांगितलं की त्यांना तिच्या जन्माची जाणीव आहे. त्यांना तिच्यापासून मुलगा होण्याची इच्छा आहे. सत्यवतीने संकोच केला. मग ऋषी पराशर म्हणाले की त्यांच्याशी संभोग केल्यानंतरही ती कुमारी राहील आणि तिच्या शरीरातील माशांचा वास नाहीसा होईल. त्याची जागा मोहक सुगंध घेईल. मग सत्यवती सहमत झाली.
advertisement
पण आणखी एक समस्या होती. बरेच लोक ऋषी पराशर आणि सत्यवती यांना नावेत पाहत होते. त्यांच्यामध्ये ऋषी आणि मुनी होते. मग सत्यवतीने संकोचून म्हटलं की ती हे कसं करू शकते, सर्वजण पाहत आहेत. मग ऋषींनी काही मंत्र म्हटला आणि नावेभोवती धुक्याची एक दाट चादर तयार झाली की कोणीही त्यांना पाहू शकलं नाही. ऋषी पराशर यांच्याशी झालेल्या मिलनातून तिने व्यासांना जन्म दिला. त्यानंतर ती पुन्हा कुमारी झाली. तिच्या शरीरातून मोहक सुगंध येऊ लागला.
advertisement

एके दिवशी राजा शंतनू यमुनेच्या काठाजवळील जंगलात होता तेव्हा त्यांना हा मोहक सुगंध जाणवला आणि नंतर काही अटी मान्य करत त्यांनी मत्स्यगंधा म्हणजेच सत्यवतीशी लग्न केलं.
view commentsLocation :
Delhi
First Published :
July 30, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat : आधी शरीराला यायचा माशाचा वास, मग पांडवांची पणजी सत्यवती सुगंधित कशी झाली?


