लवकर विवाहासाठी महाशिवरात्रीला करायचे प्रभावी उपाय
शिव-पार्वतीला 'सोळा श्रृंगार' अर्पण करा
महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री शिव मंदिरात जाऊन माता पार्वतीला सोळा श्रृंगाराचे साहित्य अर्पण करावे. अर्पण करताना "ॐ गौरीशंकराय नमः" या मंत्राचा जप करावा. यामुळे माता पार्वती प्रसन्न होऊन विवाहातील अडथळे दूर करते.
बेलाच्या पानांवर मधाचा लेप
ज्यांचे लग्न जमत नाही, त्यांनी 108 बेलाची पाने घ्यावीत. प्रत्येक पानावर पांढऱ्या चंदनाने 'राम' नाव लिहावे आणि त्यावर थोडा मध लावावा. ही पाने एक-एक करून शिवलिंगावर अर्पण करावीत. मधामुळे संबंधांमधील गोडवा वाढतो आणि विवाहाचा मार्ग मोकळा होतो.
advertisement
केशरयुक्त दुधाचा अभिषेक
महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगावर गाईच्या कच्च्या दुधात थोडे केशर टाकून अभिषेक करावा. अभिषेक करताना मनोभावे 'शिव चालीसा' किंवा 'ओम नमः शिवाय' जप करावा. गुरु ग्रहाच्या दोषामुळे विवाह लांबणीवर पडत असेल, तर हा उपाय विशेष फलदायी ठरतो.
पिवळ्या फुलांचा आणि हळदीचा उपाय
मुलींनी विवाहासाठी भगवान शंकराला पिवळी फुले अर्पण करावीत आणि माता पार्वतीला हळद अर्पण करावी. पूजेनंतर त्यातील थोडी हळद स्वतःच्या कपाळावर लावावी. मुलांनी विवाहात यश मिळवण्यासाठी महादेवांना पांढरी फुले आणि अत्तर अर्पण करावे.
महामृत्युंजय मंत्राचा जप
जर विवाहामध्ये काही 'दोष' किंवा 'नजर' लागली असेल, तर महाशिवरात्रीच्या रात्री रुद्राक्षाच्या माळेने 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यामुळे नकारात्मकता नष्ट होऊन शुभ कार्ये घरात घडण्यास सुरुवात होते. महाशिवरात्री ही साक्षात शिव-शक्तीच्या मिलनाची रात्र आहे. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने केलेले हे उपाय तुमच्या आयुष्यातील विवाहाचे स्वप्न लवकरच पूर्ण करू शकतात.
हळद आणि बिल्व पानांचा उपाय
तीन बिल्व पानांवर पिवळ्या चंदनाच्या लाकडाने किंवा हळदीने "राम" लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा. हिंदू धर्मात हळद शुभ घटनांचे प्रतीक मानली जाते. भगवान शिवाला हळद अर्पण करण्यास मनाई आहे, परंतु शिवरात्रीच्या रात्री देवी पार्वतीच्या चरणी हळद अर्पण केल्याने आणि नंतर कपाळावर हळदीचा टिळक लावल्याने लग्नाची शक्यता वाढते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
