मुंबई: महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र आणि महत्वाचा दिवस आहे. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी महाकुंभ मेळ्यातील अंतिम स्नान होणार आहे. त्यामुळे या वर्षीचा हा दिवस अधिक मंगलमय ठरणार आहे.
धार्मिक परंपरेनुसार, याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. म्हणूनच, हा दिवस शिव-शक्तीच्या एकत्वाचे प्रतीक मानला जातो. भक्तांसाठी हा दिवस आध्यात्मिक उन्नती, मोक्षप्राप्ती आणि शुभ फळ देणारा मानला जातो. महाशिवरात्रीची पूजा कशी करावी? या दिवशी कोणती साधना करावी? याबाबत मुंबईतील धर्म अभ्यासक प्रभा माने यांनी लोकल18 शी बोलताना माहिती दिलीये.
advertisement
Mahashivratri 2025: त्र्यंबकेश्वर देवस्थानचा मोठा निर्णय, महाशिवरात्रीला भक्तांसाठी पर्वणी
महाशिवरात्री 2025 ची तारीख व शुभ मुहूर्त
चतुर्दशी तिथी सुरू: 26 फेब्रुवारी 2025, सकाळी 11:08
चतुर्दशी तिथी समाप्त: 27 फेब्रुवारी 2025, सकाळी 08:54
त्यामुळे महाशिवरात्रीचा सण 26 फेब्रुवारी रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाईल.
महाशिवरात्री पूजेसाठी आवश्यक साहित्य
भगवान शिवाची विधिपूर्वक पूजा करण्यासाठी शिवलिंग आणि शिव परिवाराची मूर्ती किंवा चित्रबेलपत्र, आक, धतूरा आणि पांढरी फुले पंचामृत (दूध, दही, मध, साखर आणि गंगाजल) भस्म, चंदन, केशर, अत्तर आणि अक्षत धूप, दीप, कापूर आणि गायीचे तूप शिव चालीसा, महाशिवरात्री व्रत कथा आणि आरती ग्रंथ नैवेद्य – ठंडाई, लस्सी, मिठाई, फळे आणि हलवा हवन सामग्री, दानासाठी धान्य, वस्त्र आणि तूप ही सामग्री आवश्यक असते.
महाशिवरात्री व्रताचे महत्त्व
महाशिवरात्रीला उपवास, जागरण आणि शिवपूजा केल्याने भक्तांना विशेष आशीर्वाद मिळतो. शिवलिंगावर पंचामृत अभिषेक करून बेलपत्र अर्पण केल्याने पापांचे क्षालन होते आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते.
उपवास ठेवल्यास वैवाहिक जीवन आनंदी आणि समृद्ध होतं. रात्रभर जागरण आणि शिव नामस्मरण केल्याने पुण्य लाभ होतो. शिव मंत्रजप आणि हवन केल्याने आरोग्यदायी आणि यशस्वी जीवनाचा आशीर्वाद मिळतो.
यंदाची महाशिवरात्री अत्यंत शुभ आणि विशेष पर्वणी आहे. भक्तांनी हा दिवस शिवभक्ती, साधना आणि सेवा यासाठी समर्पित करावा, असे मानले जाते. ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करावा. याचबरोबर शिवतांडव स्तोत्र, शिवपंचाक्षरी स्तोत्र, महामृत्युंजय स्तोत्र, शिवष्टक, रुद्रष्टक स्तोत्र पठण करावे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)