Meen Sankranti 2026: मकर संक्रांत नव्हे आता मीन संक्रांत; 14 की 15 मार्चला? कोणत्या गोष्टी करणं शुभफळदायी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Meen Sankranti 2026: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ज्या राशीत प्रवेश करतो, त्या राशीच्या नावाने संक्रात साजरी केली जाते. मार्च महिन्याच्या मध्यात म्हणजेच 15 मार्च रोजी सूर्याचे राशी परिवर्तन होत आहे. सूर्यदेव पहाटे 01:08 वाजता मीन राशीत प्रवेश करतील आणि 14 एप्रिल रोजी सकाळी 09:38 वाजेपर्यंत ते याच राशीत राहतील.
मुंबई : मकर संक्रात जवळपास सर्वांना माहीत आहे, पण प्रत्येक महिन्याला सूर्याची एक संक्रात असतेच. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ज्या राशीत प्रवेश करतो, त्या राशीच्या नावाने संक्रात साजरी केली जाते. मार्च महिन्याच्या मध्यात म्हणजेच 15 मार्च रोजी सूर्याचे राशी परिवर्तन होत आहे. सूर्यदेव पहाटे 01:08 वाजता मीन राशीत प्रवेश करतील आणि 14 एप्रिल रोजी सकाळी 09:38 वाजेपर्यंत ते याच राशीत राहतील. 15 मार्च रोजी सूर्याच्या राशी परिवर्तनावेळी 5 शुभ संयोग जुळून येत आहेत. काही राशीच्या करिअर, आरोग्य आणि वैवाहिक जीवनावर याचे शुभ परिणाम होण्याची शक्यता आहे. मीन संक्रांतीच्या शुभ संयोगांबद्दल आणि या दिवशी काय करावे याबद्दल जाणून घेऊ.
सूर्याचे गोचर आणि 5 शुभ संयोग - सूर्याचे राशीपरिवर्तन होण्याच्या दिवशीच पापमोचनी एकादशी आहे. एकादशीचं हे व्रत केल्याने सर्व पापांतून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. 15 मार्च रोजी मीन संक्रांती आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्याने मोठे पुण्य लाभते. मीन संक्राती दिवशी द्विपुष्कर योग तयार होत आहे. या योगात केलेल्या शुभ कार्याचे फळ दुप्पट मिळते. सकाळी 10:25 पर्यंत परिघ योग आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठीचे उपाय करण्यासाठी हा काळ उत्तम असतो. सकाळी 10:25 नंतर दिवसभर शिव योग असेल. हा योग पूजा, साधना आणि योगाभ्यासासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
advertisement
संक्रातीचा पुण्यकाळ - सूर्याच्या संक्रांतीचा पुण्यकाळ 15 मार्च 2026 रोजी सकाळी 7 वाजून 25 मिनिटांपर्यंत असेल. संक्रांतीच्या पुण्यकाळात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे मोठे महत्त्व असते. सूर्य जेव्हा धनु आणि मीन राशीत असतो, तेव्हा काही ठिकाणी खरमास पाळतात. खरमासमध्ये लग्न, गृहप्रवेश, मुंज यांसारखी कोणतीही शुभ कार्ये केली जात नाहीत.
advertisement
मीन संक्रांतीला काय करावे?
सूर्योदयापूर्वी स्नान करावे आणि तांब्याच्या तांब्यात पाणी, सिंदूर, लाल फुले आणि अक्षत (तांदूळ) मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा आवर्जून करावी. आदित्य हृदय स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे खूप चांगले असते. सूर्य मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. गीता किंवा रामायणाचे वाचन करणे देखील उत्तम आहे. गरीब आणि गरजू लोकांना शक्य तितकी मदत किंवा दान करावे.
advertisement
या गोष्टींचे करा दान - मीन संक्रांतीच्या दिवशी अन्न, तांब्याची भांडी, तयार भोजन, कपडे, गूळ, तूप आणि पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने सूर्यदेव आणि भगवान विष्णू यांची विशेष कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 8:48 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Meen Sankranti 2026: मकर संक्रांत नव्हे आता मीन संक्रांत; 14 की 15 मार्चला? कोणत्या गोष्टी करणं शुभफळदायी








