Dakshin Vastu: अशुभ दिशा शुभ परिणाम देऊ लागते; वास्तुनुसार घरात नेहमी दक्षिण बाजूलाच ठेवायच्या या 5 गोष्टी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. योग्य दिशेला योग्य वस्तू ठेवल्यास घरात सुख-समृद्धी नांदते, तर चुकीच्या दिशेला वस्तू ठेवल्यास आर्थिक आणि मानसिक नुकसान सोसावे लागते. दक्षिण दिशा ही साधारणपणे अशुभ मानली जाते, पण काही विशिष्ट वस्तू या दिशेला..
मुंबई : आपल्या घरात कुठे काय असावं, कुठे काय असू नये याची माहिती वास्तुशास्त्रात मिळते. वास्तुशास्त्र नियमांचे जास्तीत जास्त पालन केल्याने घरात चांगल्या गोष्टी घडतात असे मानले जाते. वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व आहे. योग्य दिशेला योग्य वस्तू ठेवल्यास घरात सुख-समृद्धी नांदते, तर चुकीच्या दिशेला वस्तू ठेवल्यास आर्थिक आणि मानसिक नुकसान सोसावे लागते. दक्षिण दिशा ही साधारणपणे अशुभ मानली जाते, पण काही विशिष्ट वस्तू या दिशेला ठेवल्यास त्या भाग्योदय घडवून आणू शकतात. आर्थिक अडचणी किंवा कर्ज वाढलं असेल तर दक्षिण दिशेशी संबंधित 5 उपाय नक्की करून पाहावेत.
दागिने-पैसा - घरात सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ठेवण्यासाठी दक्षिण किंवा दक्षिण-पश्चिम दिशा सर्वोत्तम आहे. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा स्थिरतेची मानली जाते, त्यामुळे येथे ठेवलेली संपत्ती लवकर खर्च होत नाही उलट त्यात वाढ होत राहते.
पूर्वजांचे फोटो - वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीवर पूर्वजांचे फोटो लावणे अत्यंत शुभ असते. ही दिशा यम आणि पितरांची मानली जाते. या दिशेला फोटो लावल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील लोकांची प्रगती होते.
advertisement
झाडूची जागा - घरातील झाडू नेहमी दक्षिण दिशेला ठेवावा. हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला झाडू लपवून ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरात कधीही पैशांचा तुटवडा जाणवत नाही.
advertisement
जड वस्तू आणि पलंग - घराची दक्षिण दिशा जड वस्तूंसाठी उत्तम मानली जाते. कपाट, तिजोरी किंवा बेड यांसारख्या जड वस्तू या दिशेला असाव्यात. यामुळे घरात चांगले वातावरण राहते, कुटुंबात शांतता राहते. झोपताना डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला असावेत, यामुळे वैवाहिक जीवनात मधुरता राहते, आरोग्य सुधारते.
advertisement
जेड प्लांट आणि फिनिक्स पक्षी - आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी दक्षिण दिशेला जेड प्लांट ठेवणे फायदेशीर ठरते. तसेच, घराच्या हॉलमध्ये दक्षिण दिशेला फिनिक्स पक्ष्याचा फोटो लावल्याने घरातील लोकांचा कामातील आत्मविश्वास वाढतो, आरोग्य उत्तम राहते, असे मानले जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 11:59 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Dakshin Vastu: अशुभ दिशा शुभ परिणाम देऊ लागते; वास्तुनुसार घरात नेहमी दक्षिण बाजूलाच ठेवायच्या या 5 गोष्टी









