निश्चित तारीख आणि मुहूर्त
चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुरू होऊन ती 16 फेब्रुवारी च्या पहाटेपर्यंत असेल. शिवरात्रीची मुख्य पूजा 'निशिता काळात' केली जाते, जी 15 फेब्रुवारीलाच प्राप्त होत आहे. त्यामुळे याच दिवशी महाशिवरात्री व्रत पाळले जाईल.
रुद्राभिषेकाचा शुभ वेळ
यंदा रुद्राभिषेकासाठी दिवसभर शुभ मुहूर्त आहेत. मात्र, सकाळी 07:00 ते 10:30 आणि संध्याकाळी 06:30 ते रात्री 09:00 ही वेळ अभिषेकासाठी अत्यंत फलदायी मानली जात आहे. मध्यरात्रीचा 'निशिता काळ' मुहूर्त रात्री 12:09 ते 01:00 पर्यंत असेल.
advertisement
भद्रा स्थिती
ज्योतिषशास्त्रानुसार, 15 फेब्रुवारीला दुपारी भद्रा स्थिती असेल. मात्र, शास्त्रानुसार महादेवाची पूजा आणि रुद्राभिषेक करताना भद्रेचा कोणताही अशुभ प्रभाव पडत नाही. शिव स्वतः 'महाकाल' असल्याने त्यांच्या उपासनेत भद्रा अडथळा ठरत नाही.
पंचक स्थिती
यंदा महाशिवरात्रीला पंचक काळ नसेल, ज्यामुळे बांधकामे किंवा खरेदीशी संबंधित कामात अडथळे येणार नाहीत. ही स्थिती शुभ मानली जात असून भाविक निर्भयपणे आपली धार्मिक कार्ये करू शकतात.
पूजेचे नियम
महाशिवरात्रीला शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले आणि गंगाजल अर्पण करावे. भगवान शिवाला तुळस किंवा केतकीची फुले चुकूनही वाहू नका, कारण ते निषिद्ध मानले जाते.
उपवास आणि पारण
ज्या भाविकांना उपवास करायचा आहे, त्यांनी 15 फेब्रुवारीला संकल्प करावा. उपवासाचे पारण दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारीला सकाळी सूर्योदयानंतर चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी करावे. 15 फेब्रुवारीची महाशिवरात्री अध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल आहे. ग्रहांची स्थिती शुभ असल्याने या दिवशी केलेली भक्ती आणि रुद्राभिषेक शिवकृपा मिळवून देण्यास मदत करेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
