जमुई : सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरी होते मकर संक्रांत. या दिवसापासूनच सुरू होतात सण. आपल्याला माहितच असेल मकर संक्रांतीला तिळगूळ वाटण्याची परंपरा आहे. शिवाय अनेकजण या दिवशी पतंगही उडवतात.
मकर संक्रांतीला सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. फार कमीजणांना माहित असेल, मात्र या दिवशी आई आपल्या मुलाला न विसरता तीळ आणि गूळ देते. तसंच आपल्या मुलाकडून एक खास वचनही घेते. आज आपण या विशेष परंपरेबाबत जाणून घेऊया. ज्योतिषी पंडित प्रदीप आचार्य यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
15 जानेवारीला संपतोय खरमास, मग सुरू होईल लग्नसराई! तुमचं ठरतंय कधी? 'हे' आहेत मुहूर्त
संक्रांतीला आई मुलाकडून काय वचन घेते बरं?
ज्योतिषांनी सांगितलं की, या सणाच्या दिवशी तीळ, गूळ आणि तांदूळ दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बिहारमध्ये आई तीळ, गूळ आणि तांदूळ मिसळून आपल्या मुलाच्या हातावर ठेवते.
होळीच्या काळात लागणार वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण; 'या' एकाच राशीच्या व्यक्तींनी राहावं सावध!
पाचवेळा असं केल्यानंतर आई मुलाला विचारते की, मला तीळ तीळ साथ देशील का? त्यावर मुलगा हो असं उत्तर देतो. याचा अर्थ असा आहे की, आई विचारते, मी वृद्ध झाल्यावर तू माझा सांभाळ करशील का? त्यावर मुलगा आई-वडिलांची आयुष्यभर सेवा करण्याचं वचन देतो. बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ही परंपरा पाळली जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
