सापांपासून सुटका मिळवण्याचे उपाय -
अनेकदा पावसाळ्यात जेव्हा बिळे पाण्याने भरतात तेव्हा साप बाहेर येतात आणि लपण्यासाठी जागा शोधू लागतात. ज्यांची घरे नद्या, तलाव, जंगले किंवा डोंगराळ भागात आहेत, त्यांना सापांच्या हल्ल्याचा धोका जास्त असतो. तुमच्या घरी साप वारंवार येत असतील तर आजच हा उपाय करून पहा.
आध्यात्मिक गुरू डॉ. शिवम साधकजी महाराज यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील पोस्टमध्ये घरात साप येऊ नयेत यासाठीच्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली आहे. हिवाळ्यात घरात साप येतात, भिंती, छिद्रे, बूट, पिशव्या इत्यादींमध्ये लपून बसतात, आपल्याला त्याची जाणीवही नसते. आपल्या घरी साप वारंवार येत असतील किंवा आपले घर अशा ठिकाणी असेल जेथे सापांचा वावर सतत असतो. तर तुम्ही हा उपाय एकदा नक्की करून पाहू शकता.
advertisement
धनिष्ठा नक्षत्रातील गुरुवार लकी! या मूलांकांवर धन बरसात; सगळी चालू कामं ओके
तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर असे शब्द लिहावेत, 'तुला आस्तिक मुनीची शपथ आहे'. असं घरात लिहून ठेवल्यास साप तुमच्या घरात यायचे बंद होतील.
डॉ. शिवम साधकजी महाराजांच्या मते, प्राचीन काळी, एका यज्ञादरम्यान आस्तिक मुनींनी सापांच्या संपूर्ण शरीरातील विष काढून त्यांच्या तोंडात भरले होते. तेव्हापासून सापांना आस्तिक मुनीच्या नावाची खूप भीती वाटते. त्यामुळे आपण आस्तिक मुनींच्या नावाने शपथ घातली आणि हे शब्द घराच्या भिंतीवर लिहिले तर नक्कीच तुमच्या घरात साप येणे थांबतील.
कष्ट-संघर्ष फळास! या राशींचे आता नशीब चमकणार; घेतलेले निर्णय भविष्य घडवणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
