गोत्राचे महत्त्व - गोत्र या शब्दाचा शाब्दिक अर्थ कुल किंवा वंश असा होतो. प्राचीन काळी ऋषी-मुनींच्या वंशजांना वेगवेगळ्या गोत्रांमध्ये विभागले गेले. प्रत्येक गोत्राचे नाव त्या मूळ ऋषींच्या नावावरून ठेवले गेले आहे. उदाहरणार्थ कश्यप, भारद्वाज किंवा गौतम गोत्र. एकाच गोत्राचे लोक हे एकाच पूर्वजाचे वंशज मानले जातात, त्यामुळे त्यांचे रक्ताचे नाते असल्याचे मानले जाते.
advertisement
धार्मिक कारणे काय - सनातन धर्मात व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत एकूण 16 संस्कार सांगितले आहेत. विवाह हा देखील त्यापैकीच एक संस्कार आहे, ज्यानंतर व्यक्तीच्या गृहस्थ जीवनाची सुरुवात होते. धर्मग्रंथांनुसार, एकाच गोत्रातील लोक हे एकमेकांचे भाऊ-बहीण मानले जातात. त्यामुळे त्यांच्यातील विवाह हा ऋषी परंपरेचे उल्लंघन मानला जातो. एकाच गोत्रात विवाह केल्याने जीवनात अडचणी येतात आणि विवाह दोष निर्माण होतो, अशी धार्मिक धारणा आहे. याशिवाय अशा विवाहामुळे होणाऱ्या संततीमध्ये शारीरिक आणि मानसिक समस्या येऊ शकतात, असेही मानले जाते.
मुलांची वारंवार झोपमोड होते, घाबरून उठतात; हनुमान चालिसेतील 7 टिप्स उपयुक्त
गोत्र नियमाचे पालन का आवश्यक आहे?
सनातन धर्मातील हजारो वर्षांच्या जुन्या परंपरांचा पाया खूप भक्कम आहे, कारण एकाच कुळात लग्न न करण्याच्या या नियमाला विज्ञानाचाही पाठिंबा आहे. एकाच कुळात किंवा गोत्रात विवाह केल्यास संततीमध्ये अनुवांशिक दोष येण्याची शक्यता जास्त असते. याला विज्ञानात इनब्रीडिंग म्हणतात. यामुळे मुलांमध्ये शारीरिक किंवा मानसिक असामान्यता दिसून येऊ शकते. म्हणून विवाहामध्ये गोत्राच्या नियमाचे पालन करणे हे केवळ धार्मिक कारणांसाठीच नाही, तर होणाऱ्या मुलांच्या आरोग्याच्या आणि विकासाच्या दृष्टीनेही आवश्यक मानले जाते.
