Hanuman chalisa: मुलांची वारंवार झोपमोड होते, घाबरून उठतात; हनुमान चालिसेतील 7 टिप्स उपयुक्त
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Hanuman chalisa Marathi: सध्याचा जमाना वेगाचा आहे, सगळं काही फार लवकर-वेगात बदलत आहे. त्यामुळे आजच्या काळात मुलांची दिनचर्या खूप बदलली आहे. मोबाईल, टीव्ही, ऑनलाइन क्लास, बदलणारे वातावरण आणि एकटेपणा यामुळे अनेकदा त्यांच्या मनावर काही गोष्टींचा परिणाम होतो. लहान मुले अनेकदा विनाकारण घाबरतात, रात्री दचकून जागी होतात, वाईट स्वप्ने पाहतात किंवा झोपायला घाबरतात. पालकांचे अनेक प्रयत्न होऊनही प्रत्येक वेळी औषधे किंवा रागवून यावर उपाय मिळत नाही. यासाठी काही आध्यात्मिक उपाय आजही तितकेच प्रभावी मानले जातात. हिंदू धर्मात हनुमान चालीसा हा अतिशय शक्तिशाली स्तोत्र मानला जातो. हनुमान चालिसा पूजापाठापुरती मर्यादित नसून ती मनाला स्थिर करण्यासाठी आणि भीती घालवण्यासाठीही उपयुक्त आहे. रात्री मुलांना झोपताना हनुमान चालीसा ऐकवल्याने त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते, असे मानले जाते. या विषयावर ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा अधिक माहिती देत आहेत.
हनुमान चालीसेच्या ध्वनीमध्ये एक वेगळाच लय असतो. जेव्हा ती संथ आणि मधुर आवाजात ऐकवली जाते, तेव्हा मुलाचे मन हळूहळू शांत होऊ लागते. दिवसाभराची धावपळ, भीती किंवा अस्वस्थता कमी होते आणि मेंदू विश्रांतीच्या स्थितीत जातो. यामुळेच मुले लवकर झोपतात आणि त्यांची झोपही गाढ होते. ज्या मुलांना वारंवार झोपमोड होण्याची किंवा घाबरून उठण्याची सवय असते, त्यांच्यातही काळानुसार सुधारणा दिसून येते.
advertisement
लहान मुलांना अंधाराची भीती, एकटे झोपण्याची समस्या किंवा वाईट स्वप्ने पडणं या कॉमन गोष्टी आहेत. हनुमान चालीसा निर्भयता आणि सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे आसपासची नकारात्मक ऊर्जा दूर राहते. मूल दररोज हनुमान चालिसा ऐकतं, तेव्हा त्याच्या मनात एक विश्वास निर्माण होतो, आपण सुरक्षित आहोत. यामुळे घाबरणे कमी होते आणि आत्मबळ वाढते.
advertisement
हनुमानाला महाबली आणि धाडसी मानलं जातं. त्यांच्या कथा आणि चालीसामधील शब्द मुलांच्या मनात धैर्याचे बी पेरतात. हळूहळू मूल स्वतःला भक्कम समजू लागते. शाळेत जाण्याची भीती, एकट्या खोलीत राहण्याची समस्या किंवा नवीन लोकांना भेटताना येणारा संकोच कमी होऊ लागतो. हा बदल एका दिवसात येत नाही, परंतु नियमितपणे चालीसा ऐकवल्याने परिणाम स्पष्ट दिसू लागतो.
advertisement
हनुमान चालीसा ऐकल्याने शरीरात सकारात्मक उर्जा वाढते. मूल मानसिकदृष्ट्या शांत असते, तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावरही दिसतो. चांगल्या झोपेमुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि मूल अधिक सक्रिय वाटते. अनेक पालकांचे असे मत आहे की नियमितपणे चालीसा ऐकवल्याने मुलांमधील सुस्ती कमी होते आणि ते दिवसभर उत्साही राहतात.
advertisement
काही मुले दररोज एकाच वेळी हनुमान चालीसा ऐकत असल्यास, तो त्यांच्या दिनचर्येचा भाग बनतो. यामुळे त्यांची एकाग्रता वाढू लागते. हळूहळू ते त्यातील शब्द ओळखू लागतात आणि अर्थ जाणून घेण्याची जिज्ञासाही वाढते. पालकांनी जर सोप्या भाषेत काही ओळींचा अर्थ समजावून सांगितला, तर मुलाची समज आणि विचार करण्याची पद्धत दोन्ही सुधारतात.
advertisement
advertisement
मुलांना हनुमान चालीसा ऐकवताना काही लहान गोष्टी लक्षात ठेवा. नेहमी ती संथ आणि प्रेमळ आवाजात ऐकवा. मोबाईल किंवा मोठ्या स्पीकरऐवजी स्वतः ती म्हणून दाखवणे जास्त प्रभावी मानले जाते. सुरुवातीला पूर्ण चालीसा नाही म्हटली तरी चालेल, किमान काही ओळी रोज ऐकवा. आठवड्यातून एक-दोनदा सोप्या शब्दांत अर्थ समजावून सांगितल्याने मुलांवर अधिक चांगला परिणाम दिसतो.










