भक्ते कुटुंबात जन्मलेली सती अनुसया माता
गावकरी सांगतात की, त्यांचे वडील रामजी भक्ते पाटील आणि आई अनायी या दाम्पत्याच्या पोटी माता जन्मल्या. उमरी गावातील जंगलुजी खंदाईत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मात्र, संसारिक जीवनापेक्षा त्यांनी अध्यात्माचा मार्ग पत्करला. काळानुसार त्यांचे दिव्य लीला कार्य लोकांसमोर प्रकट होऊ लागले आणि त्यांनी सांसारिक बंधनातून स्वतःची मुक्तता करून घेतली. भ्रमंती करताना मातेने मिळेल ते खाल्ले, भिक्षा मागून आपले जीवन व्यतीत केले. त्या काळात काहींनी त्यांना वेडसर समजून घराबाहेरही काढले. तरीही त्यांनी भक्तांना अनेक चमत्कार दाखविले. मेलेले कुत्रे जिवंत करणे, आंधळ्यांना दृष्टी परत मिळवून देणे, आजारी व्यक्तींना बरे करणे अशा अनेक लीला त्यांनी प्रकट केल्या, असंही ते सांगतात.
advertisement
Navratri 2025: तेजस्वी रुप आणि सरोवराचं सानिध्य, लोणारमधील देवीचं श्री रामांनीही घेतलं होतं दर्शन
मातेचे आकर्षक असे समाधी मंदिर
काही काळ आजारी राहिल्यानंतर 10 जानेवारी 1997 रोजी मातेने देह सोडला. त्यांचे समाधी मंदिर पारडशिंगा या गावात उभारण्यात आले असून ते आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे ध्यान मंदिरात मातेच्या सर्व लीला कार्यांचे फोटो लावलेले असून, भक्तांना त्या स्मरणातून अध्यात्मिक शांतीचा अनुभव येतो. नवरात्रीत या समाधी मंदिराची भव्य सजावट केली जाते.
निसर्गरम्य वातावरणात असलेलं मंदिर
सती अनुसया माता मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते समाधी मंदिरापर्यंत वेलींचा मंडप उभारला आहे. तो नेहमीसाठी असतो. त्यामुळे भक्तांना निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येतो. त्यातून जाताना भक्तांना निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घेता येतो. तसेच मंदिर परिसरात आकर्षक गार्डन आहे. भक्तांसाठी भोजन, निवास, विश्रांती आदींची सर्व सोय मंदिर व्यवस्थापनाकडून केली जाते. विशेष म्हणजे येथील कच्चा चिवडा विशेष लोकप्रिय आहे. विविध बचत गटाच्या महिलांनी त्याठिकाणी व्यवसाय सुरू केले आहे.
नवरात्रीच्या काळात पारडशिंगा गाव उत्साह, भक्ती आणि आध्यात्मिक उर्जेने नटून जाते. दूरदूरहून येणारे भाविक येथे सती अनुसया मातेच्या समाधीवर माथा टेकवत आपले कष्ट हलके करतात, अशी माहिती पुजाऱ्यांनी दिली.





