TRENDING:

धन-संपत्ती-पैसा हवाय? तर घरात 'या' दिशेला ठेवा चांदीचा ग्लास, देवी लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद

Last Updated:

घरात लक्ष्मीचे वास्तव्य व्हावे, संपत्ती स्थिर राहावी यासाठी ज्योतिषाचार्य केशवदत्त शर्मा यांनी ४ दिशांशी संबंधित उपाय सांगितले आहेत. ईशान्य कोपऱ्यात चांदीचा ग्लास ठेवून त्यात तांदूळ भरा. आग्नेय दिशेला...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भौतिक जीवनात संपत्तीला खूप महत्त्व आहे, कारण ती आपल्या दैनंदिन गरजा, सुख आणि सोयीसुविधा पूर्ण करण्याचं साधन आहे. ज्याच्याकडे पैसा नाही, तो गरीब राहतो आणि त्याची प्रगती होत नाही. त्यामुळेच लोक देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अनेक उपाय करतात, जेणेकरून त्यांना धनलाभ व्हावा आणि त्यांचं धन कायम टिकून राहावं. अपार धन मिळवण्यासाठी ज्योतिषी केशव दत्त शर्मा चांदीचा ग्लास आणि घराच्या 4 दिशांशी संबंधित उपाय सांगत आहेत.
Wealth astrology remedies
Wealth astrology remedies
advertisement

ज्योतिषाचार्य शर्मा यांच्या मते, जर तुम्हाला प्रचंड धन आणि संपत्ती हवी असेल, दीर्घकाळ अखंड लक्ष्मीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, तर घराच्या चार दिशांमध्ये हे चार उपाय नक्की करा.

चांदीच्या ग्लासचा उपाय : तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक चांदीचा ग्लास ठेवा. तो ग्लास तांदळाने भरा आणि तिथेच राहू द्या.

लक्ष्मी मातेच्या मूर्तीचा उपाय : तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच अग्नी कोनात लक्ष्मी मातेचा फोटो लावा. या फोटोत देवी लक्ष्मी बसलेल्या स्थितीत आणि धनवर्षा करताना दिसत असावी. हे स्थिर लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं.

advertisement

लवंग-वेलचीचा उपाय : यानंतर तुमच्या घराच्या वायव्य कोपऱ्यात म्हणजेच वायव्य कोनात लवंग, वेलची, दालचिनी आणि जायफळ ठेवा. जायफळ तोडून ठेवावं लागेल. वेलची सोलून ठेवावी, जेणेकरून तिचे दाणे दिसतील.

मोरपिसाचा उपाय : आता तुम्हाला चौथा उपाय घराच्या नैऋत्य कोपऱ्यात म्हणजेच दक्षिण-पश्चिम कोनात करायचा आहे. नैऋत्य कोपऱ्यात एक मोरपीस ठेवा. हे 4 उपाय केल्याने तुम्हाला अपार धन आणि संपत्ती मिळेल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल आणि चारही दिशांनी पैसा येऊ लागेल.

advertisement

ज्योतिषी केशव दत्त शर्मा सांगतात की, जर तुम्हाला धन हवे असेल, तर ते तुम्ही तुमच्या इष्ट देवतेकडून मिळवू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या इष्ट देवतेच्या मंदिरात जाता किंवा घरी इष्ट देवतेसमोर बसता.

तेव्हा पूजा, ध्यान इत्यादीनंतर तुमच्या इष्ट देवतेला म्हणा की, हे प्रभु! माझ्यावर कृपा करा. तुमच्या कृपेच्या शक्तीने, तुमच्या अदृश्य शक्तीने, तुमच्या कर्मशक्तीने, तुमच्या ज्ञानशक्तीने आणि तुमच्या इच्छाशक्तीने माझं कल्याण करा. जर तुम्ही हे सतत करत राहिलात, तर तुमची पंचमहाभूतं तुम्हाला धन देऊ लागतील. ज्या क्षणापासून तुम्ही हे म्हणायला सुरुवात कराल, त्यानंतर 41 दिवसांच्या आत तुम्हाला बदल दिसू लागतील.

advertisement

हे ही वाचा : आता महागडी क्लीनिंग प्रोडक्ट विसरा, फक्त 1 बटाटा वापरा, घर होईल एकदम फर्स्ट क्लास!

हे ही वाचा : फ्रिजमध्ये बर्फ जमा होतोय? फाॅलो करा 'या' सोप्या टिप्स; बर्फही निघून जाईल अन् लाइट बिल कमी येईल

मराठी बातम्या/अध्यात्म/
धन-संपत्ती-पैसा हवाय? तर घरात 'या' दिशेला ठेवा चांदीचा ग्लास, देवी लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल