TRENDING:

Vastu Tips : पैसा टिकत नाही? ज्योतिषशास्त्रानुसार 'हे' उपाय करा, लक्ष्मी होईल प्रसन्न!

Last Updated:

ज्योतिष व वास्तुशास्त्रानुसार, घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. तुळशीला पाणी अर्पण करणे, सूर्याला जल अर्पण करणे, मिठाचा उपाय, आणि लक्ष्मीपूजन...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आजच्या धावपळीच्या जीवनात पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो वाचवणेही महत्त्वाचे आहे. अनेकदा असे घडते की, आपण खूप मेहनत करतो, पैसा कमावतो पण तो टिकत नाही. तो येतो आणि लगेच खर्च होतो. तुमच्यासोबतही असेच घडत असेल, तर काळजी करू नका. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये काही असे उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकता आणि पैसे वाचवू शकता. ज्योतिषी अंशुल त्रिपाठी यांच्याकडून पैसे टिकवण्यासाठी काही सोपे आणि खात्रीशीर उपाय जाणून घ्या...
News18
News18
advertisement

पैसे न टिकण्याची काही मुख्य कारणे

  • चुकीचं वास्तु : ज्योतिषी अंशुल त्रिपाठी यांच्या मते, घराचं वास्तु योग्य नसेल, तर नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो, ज्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात.
  • ग्रहांची स्थिती : ज्योतिषी अंशुल त्रिपाठी यांच्या मते, ग्रहांची स्थितीही आर्थिक स्थितीवर परिणाम करते.

पैसे वाचवण्यासाठी काही खात्रीशीर उपाय

advertisement

  1. घराची स्वच्छता : ज्योतिषी अंशुल त्रिपाठी यांच्या मते, जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी देवी वास करते. त्यामुळे, नेहमी घर स्वच्छ ठेवा, विशेषतः ईशान्य दिशा.
  2. तुळशीची पूजा : दररोज तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि संपत्ती वाढते.
  3. सूर्याला पाणी : सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा. यामुळे अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होते.
  4. advertisement

  5. मीठाचा उपाय : घराच्या ईशान्य दिशेला एका भांड्यात मीठ ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
  6. झाडूचा आदर : झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. ते नेहमी लपवून ठेवा आणि त्यावर पाय ठेवू नका.
  7. दान : तुमच्या कमाईचा काही भाग दान करा. यामुळे पुण्य मिळते आणि आर्थिक स्थिती सुधारते.
  8. गुरुवारचा उपवास : ज्योतिषी अंशुल त्रिपाठी यांच्या मते, भगवान विष्णूला समर्पित गुरुवारचा उपवास केल्यानेही संपत्ती मिळते.
  9. advertisement

  10. कापुराचा उपाय : शुक्रवारी कापूर जाळून त्यातून काजळ बनवा आणि ज्या व्यक्तीकडून तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत त्याचे नाव भोजपत्रावर लिहा. यामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.

इतर काही सूचना

  • रात्री स्वयंपाकघरात घाणेरी भांडी ठेवू नका.
  • घरात घाण ठेवू नका.
  • घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा.
  • या उपायांचा अवलंब केल्याने तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकता आणि पैसे वाचवू शकता.
  • advertisement

हे ही वाचा : मोठी चूक ठरेल! घरात अशा ठिकाणी बसून कधीच खाऊ नये; वाईट दिवस पाहावे लागतील

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसाने घेतली पुणे पालिकेची 'परीक्षा', ढगफुटी की आणखी काही? महापौरांनी स्पष्ट सांगितलं!
सर्व पहा

हे ही वाचा : Rahu Ketu Dosh Upay: अडचणी-दवाखाना! त्रासांच्या मागे राहु-केतु नाही ना? या उपायांनी बसेल नीट घडी

मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips : पैसा टिकत नाही? ज्योतिषशास्त्रानुसार 'हे' उपाय करा, लक्ष्मी होईल प्रसन्न!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल