धार्मिक ग्रंथांमध्ये सरस्वती मातेला विद्येची देवी म्हटले जाते. जर एखाद्या विद्यार्थ्याने देवी सरस्वतीची नियमित पूजा केली आणि ‘ॐ सरस्वती ईश्वरी भगवती माता क्रां क्रीं मम ज्ञान देहि फट स्वाह ।।’ या मंत्राचा 21 वेळा जप केला, तर त्याच्या बुद्धीचा विकास होतो. त्याबरोबर दर शुक्रवारी गाईला गवत आणि गूळ खाऊ घातल्यानं अभ्यासात एकाग्रता वाढू शकते.
advertisement
गणेश गायत्री मंत्राचा जप -
ज्योतिषशास्त्रानुसार, नियमितपणे गणेश गायत्री मंत्राचा 11 वेळा जप केल्यास श्रीगणेश प्रसन्न होतात. यामुळे बुद्धी तीक्ष्ण आणि सकारात्मक होते आणि मुलाला अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतात.
सुकर्मा, घृति योगात या राशींना मिळणार भाग्याची साथ; आजचं राशिभविष्य 21 मार्च
श्री गणेश गायत्री मंत्र
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ।
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।
विद्यार्थ्यांनी लाल शाई वापरू नये -
पंडितजींच्या मते, 'लाल शाई मूल्यमापन आणि चूक सुधारण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे मुलांनी लेखनासाठी नेहमी निळ्या शाईचे पेन वापरावे. निळ्याला शाईला धार्मिक महत्त्व देखील आहे. निळ्या रंगाचे वर्णन प्रगती आणि सकारात्मक बदलाचा रंग म्हणून केले जाते. यामुळे बौद्धिक प्रगतीही होते, असे मानले जाते.
झोपाळ्याचं वास्तुशास्त्र! घरात झोपाळा या दिशेला असणं शुभ, झुलण्यापूर्वी पहा नियम
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)