या देशात मुस्लिमांची संख्या ही 87.5 टक्के असून हिंदू केवळ 3 टक्के आहेत. नोटेवर गणपतीचा फोटो का? नोटेवर गणपतीचा फोटो का? या बद्दल जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असाल.
भारताप्रमाणे इंडोनेशियामध्ये देखील रूपया हे चलन आहे. इंडोनेशियातील 20 हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. या ठिकाणी गणपती हा शिक्षण, कला आणि विज्ञानाची देवता म्हणून मानला जातो.
advertisement
इंडोनेशियातील 20 हजाराच्या नोटेवर गणपती तर मागे वर्गाचा फोटो आहे. वर्गाच्या फोटोमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी देखील दिसत आहेत. शिवाय, इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचा देखील फोटो आहे. देवांत्रा हे स्वातंत्र्य संग्रमात देखील अग्रेसर होते.
खूप कष्ट सोसलं! आता या राशींना संघर्षाचं शुभफळ; शनि-शुक्राच्या साथीनं धनलाभ
आणखी काय आहे कारण -
काही वर्षांपूर्वी इंडोनेशियामध्ये अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. त्यावेळी विचारविमर्श करून अर्थतज्ज्ञांनी 20 हजाराची नोट जारी केली. त्यावर गणपतीचा फोटो होता. त्यामुळेच अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं इथल्या लोकांचं म्हणणं आहे.
अर्जुन, श्रीकृष्णाची देखील मूर्ती इंडोनेशियामध्ये केवळ नोटेवर गणपतीचाच फोटो नाही तर, इंडोनेशियाच्या मॅस्कोटवर हनुमान आहे. शिवाय, फेसम टुरिझम टेस्टिनेशनवर अर्जुन आणि श्रीकृष्णाची मूर्ती लावण्यात आलेली आहे.
घरातील गणपती बाप्पाचे विसर्जन किती दिवसांनी करावे? ज्योतिष तज्ज्ञ काय सांगतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)