Ganesh chaturthi 2024: घरातील गणपती बाप्पाचे विसर्जन किती दिवसांनी करावे? ज्योतिष तज्ज्ञ काय सांगतात

Last Updated:

Ganesh chaturthi 2024: यंदा पंचांगानुसार भाद्रपद शुद्घ चतुर्थीची सुरुवात 06 सप्टेंबरला दुपारी 3.01 मिनिटापासून होत आहे. 07 सप्टेंबरला शनिवारी संध्याकाळी 5.37 पर्यंत चतुर्थी आहे. सकाळी 11.03 ते दुपारी 1.34 मिनिटांपर्यंत गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे.

News18
News18
मुंबई : आपल्या सगळ्यांनाच सध्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. कुणी शाडूची मूर्ती घरी घडवायला घेतली आहे तर कुणी आपल्या मूर्तीकाराकडे जाऊन आवडीची मूर्ती निवडली आहे. 07 सप्टेंबरला घरोघरी भक्तीभावाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. काही घरांमध्ये हा सण 07 दिवस तर काही घरांमध्ये 10 दिवस साजरा केला जातो. हिदू धर्मशास्त्रानुसार योग्य काय? जाणून घेऊया.
शास्त्रानुसार गणेश चतुर्थीचा उत्सव हा सात दिवस साजरा केला जायला हवा. सात दिवस हा काळ गणेशाचा जन्म, पूजा आणि विसर्जन हे चक्र दर्शवतो. गणरायाची कृपादृष्टी प्राप्त करुन घेण्यासाठी सात दिवसांचा कालावधीच योग्य मानला जातो. ज्योतिषाचार्य
अरुणेश शर्मा सांगतात, काही घरांमध्ये एकादशीच्या दिवशी गणरायाचं विसर्जन केलं जातं. काही घरांमध्ये एकादशीला मूर्ती किंचित हलवली जाते आणि दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला तिचं विसर्जन करतात. मात्र ते चुकीचं आहे. एकादशीला विसर्जनानंतर गणेशोत्सवाचा समारोप होतो. द्वादशीला पाच दिवसांचा पंचक काळ सुरू होतो. पंचक काळात कोणतंही मंगलकार्य करणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे गणरायाचं विसर्जन एकादशीला करणंच योग्य आहे, असंही शर्मा स्पष्ट करतात.
advertisement
यंदा पंचांगानुसार भाद्रपद शुद्घ चतुर्थीची सुरुवात 06 सप्टेंबरला दुपारी 3.01 मिनिटापासून होत आहे. 07 सप्टेंबरला शनिवारी संध्याकाळी 5.37 पर्यंत चतुर्थी आहे. सकाळी 11.03 ते दुपारी 1.34 मिनिटांपर्यंत गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे. गणरायाची शास्त्रशुद्ध उपासना करण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यानंतर सात दिवस त्याची पूजाअर्चा केली जाते. सकाळी आणि संध्याकाळी आरती करून मोदक, दूध, फळं आणि गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि एकादशीच्या दिवशी त्याचं विसर्जन केलं जातं. 
advertisement
गणरायाला आपण विघ्नहर्ता म्हणतो. त्याच्या उपासनेने सर्व शुभकार्यांची सुरुवात करतो. त्यामुळे सर्व विघ्न दूर होतात असं मानलं जातं. गणेश चतुर्थी हा नवीन उपक्रमांची सुरुवात करण्यासाठी उत्तम मुहूर्त मानला जातो. गणराया ही बुद्धीची देवता आहे. विद्यार्थी त्याची उपासना करतात. गणेशाच्या आगमनाने सर्व संकटं दूर होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
advertisement
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाडूच्या मातीपासून घडवलेली, बसलेल्या स्वरुपातील गणपतीच्या मूर्तीची पूजा केली जाते. त्यासाठी डाव्या सोंडेची मूर्ती निवडण्याचा सल्ला ज्योतिषी देतात. 
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganesh chaturthi 2024: घरातील गणपती बाप्पाचे विसर्जन किती दिवसांनी करावे? ज्योतिष तज्ज्ञ काय सांगतात
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement