Ganesh Chaturthi 2024: घरात पूजेसाठी गणपतीची मूर्ती कशी असावी? या गोष्टी पाहून मगच करा खरेदी
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Ganesh Chaturthi 2024: माणसाला ज्ञात 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेला वक्रतुंड महाकाय गणपती यंदा सात सप्टेंबरला आपल्या घरी येणार आहे. त्या निमित्ताने आत्तापासूनच आपलं घरदार, आपले बाजार असं सगळंच गणेशमय झालंय. महाराष्ट्रात गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. शहरी भागांत सार्वजनिक गणेशोत्सवाची धामधूम असते. मात्र घरच्या गणपतीचा उत्साह आणि तयारी वेगळीच असते.
advertisement
7 सप्टेंबरला घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. आपण या दिवसाची वर्षभर वाट पाहतो आणि महिनोनमहिने तयारी करतो. श्रावण महिना सुरु होताच मूर्ती विक्रेते मोठमोठे मांडव टाकून मूर्तींची मांडणी करतात. त्यातली मनासारखी मूर्ती निवडून आपण भक्तीभावाने ती घरी आणतो आणि तिची प्राणप्रतिष्ठाही करतो. गणपतीला त्याच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य दाखवतो. गणरायाच्या आगमनाने घरोघरी सुखशांती, समृद्धी नांदते.
advertisement
advertisement
advertisement
गणपतीची शेंदरी रंगाची मूर्ती पूजणं उत्तम मानलं जातं. त्यामुळे घरातील व्यक्तींच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि करिअरमध्ये त्यांची वाटचालही समाधानकारक होते. गणपतीच्या हातात मोदक असलेली मूर्ती घ्या. गणपतीचं वाहन उंदीर हाही मूर्तीबरोबर हवाच. गणपतीची मूर्ती कशी असावी, याबाबत हिंदू धर्म शास्त्रानुसार काही नियम आहेत तसे ती कशी असू नये याबाबतही नियम आहेत.
advertisement
गणपतीच्या मूर्तीची सोंड उजव्या बाजूला असलेली मूर्ती घेऊ नका. उजव्या सोंडेचा गणपती हा कठोर स्वभावाचा मानला जातो. त्याची पूजाअर्चा आणि उपासना अत्यंत शिस्तीत व्हावी लागते. त्यात काही चूक होणं योग्य नाही. त्यामुळेच घरगुती पूजेसाठी अशी मूर्ती न निवडण्याचा सल्ला दिला जातो. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)