ऋषिकेश : आपण निरखून पाहिलं असेल तर आपल्या तळहातावर काही ठळक रेषा असतात आणि काही लहान-लहान रेषा असतात. या रेषांवरून व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीपासून प्रेमाविषयी सारंकाही कळतं. शिवाय या रेषा व्यक्तीच्या भूतकाळापासून भविष्य काळाचीही माहिती देतात. कधी प्रगती होणार, किती प्रगती होणार हेसुद्धा या रेषांवरून कळतं. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात तळहातावरील रेषांना विशेष महत्त्व आहे.
advertisement
उत्तराखंडतील ऋषिकेशमध्ये असलेल्या जेम्स अँड हँडीक्राफ्ट दुकानाचे मालक आणि हस्तरेषांचे जाणकार अशोक यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, हस्तरेखाशास्त्रात केवळ व्यक्तीच्या हातावरील रेषाच वाचता येत नाहीत, तर तिची बोटं आणि नखांवरूनही बरीच माहिती कळते.
शनिवारी चुकूनही करू नका 'या' 5 वस्तूंची खरेदी; एवढ्या अडचणी येतील की, डोकं वर नाही निघणार!
4 रेषा असतात अत्यंत खास
व्यक्तीच्या हातावरील रेषांवरून कळतं की येणारा काळ तिच्यासाठी काय घेऊन येणार आहे. या काळात तिचं आरोग्य, धनसंपत्ती, करियर आणि वैवाहिक जीवन कसं असेल, हे कळतं. हातावर चार रेषा अशा असतात ज्यांना हस्तरेखाशास्त्रात प्रचंड महत्त्व आहे. या रेषांवरूनच व्यक्तीचं भविष्य ठरतं.
अप्सरेसारखी सुंदर बायको हवी? मग ही संक्रांत चूकवू नका! फक्त 1 दान बदलेल तुमचं आयुष्य
नेमकं काय सांगतात तळहातावरील रेषा?
साधारणतः प्रत्येक व्यक्तीच्या हातावर दोन सूर्य रेषा असतात. मोठी सूर्य रेषा आर्थिक स्थिती दर्शवते, तर छोटी सूर्य रेषा आयुष्यातल्या अडचणी दर्शवते. बोटावर असणाऱ्या मस्तिष्क रेषेला बुद्धी रेषा म्हटलं जातं. जर मस्तिष्क रेषा आणि जीवन रेषेची एकाच ठिकाणाहून सुरुवात झाली असेल, तर ती व्यक्ती अत्यंत बुद्धिमान आणि हुशार मानली जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g