पंचक म्हणजे नक्की काय?
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीतून भ्रमण करतो आणि धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती या पाच नक्षत्रांमध्ये असतो, त्या कालावधीला 'पंचक' असे म्हणतात. या पाच दिवसांच्या काळात विशिष्ट अशुभ प्रभाव असतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
पंचक काळात 'ही' 5 कामे करणे पडू शकते महागात
advertisement
1. दक्षिण दिशेला प्रवास: पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. शास्त्रानुसार दक्षिण ही 'यमराज' यांची दिशा आहे. या काळात या दिशेला प्रवास केल्याने अपघात, शारीरिक व्याधी किंवा मानसिक त्रासाची शक्यता असते.
2. घराचे छत टाकणे: जर तुमचे घराचे बांधकाम सुरू असेल, तर पंचक काळात घराचा स्लॅब किंवा छत टाकण्याचे काम कधीही करू नका. असे मानले जाते की, या काळात टाकलेले छत घरात क्लेश, भांडणे आणि धनहानी घेऊन येते.
3. लाकूड खरेदी आणि साठा: पंचक सुरू असताना लाकूड खरेदी करणे, गवत गोळा करणे किंवा लाकडाच्या वस्तू बनवणे अशुभ मानले जाते. यामुळे 'अग्नीभय' वाढते, म्हणजेच घरात आग लागण्याची भीती निर्माण होऊ शकते.
4. नवीन खाट किंवा बेड बनवणे: या पाच दिवसांत नवीन पलंग, खाट किंवा बेड खरेदी करू नये आणि बनवूही नये. असे केल्याने कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य बिघडते किंवा झोपेशी संबंधित समस्या उद्भवतात.
5. अंत्यसंस्काराचे कडक नियम: सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पंचक काळात झालेला मृत्यू. असे मानले जाते की, या काळात मृत्यू झाल्यास कुटुंबावर मोठे संकट येते. दोष टाळण्यासाठी मृतदेहासोबत कुशाचे किंवा पिठाचे पाच पुतळे जाळावे लागतात, जेणेकरून पंचक दोष मिटतो.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
