Modak Recipe : गणेश जयंतीला बनवा साजूक तुपातले उकडीचे मोदक, या पद्धतीनं अजिबात नाही फुटणार, रेसिपीचा Video
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गणपतीचा नैवेद्य म्हणून प्रत्येकाच्या घरी मोदक हे आवर्जून बनतात. परंतु हेच मोदक बनवताना वापरलेली पद्धत चुकीची ठरली की मोदक एकतर फुटतात किंवा वाफेवर ठेवल्यानंतर चिपकतात.
ठाणे : आता येणारा सण म्हणजे गणेश जयंती. या दिवशी किंवा चतुर्थीला गणपतीचा नैवेद्य म्हणून प्रत्येकाच्या घरी मोदक हे आवर्जून बनतात. परंतु हेच मोदक बनवताना वापरलेली पद्धत चुकीची ठरली की मोदक एकतर फुटतात किंवा वाफेवर ठेवल्यानंतर चिपकतात. त्यामुळे सहसा काही घरात मोदक रेडिमेड मागवले जातात. तर घरीच मोदक कसे बनवायचे याची रेसिपी पाहुयात.
मोदक बनवण्यासाठी साहित्य:
तांदळाचे पीठ (कच्चे): 2 कप
पाणी: 2 कप (किंवा आवश्यकतेनुसार)
दूध (ऐच्छिक): 2 चमचे
साजूक तूप: 1 चमचा
मीठ: चिमूटभर
सारणासाठी:
ओले खोबरे (खवलेले): 1.5 कप
गूळ (किसलेला): 3/4 कप (चवीनुसार)
साजूक तूप: 1 चमचा
खसखस (भाजलेली): 1 चमचा (ऐच्छिक)
वेलची पूड: 1/2 चमचा
जायफळ पूड: चिमूटभर
सुकामेवा (काजू, बदाम, मनुके, तुकडे): 1-2 चमचे (ऐच्छिक)
advertisement
मोदक बनवण्याची कृती:
सारण बनवणे:
एका भांड्यात तूप गरम करा. त्यात खोवलेलं खोबरं, किसलेला गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत आणि मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत परता.
वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिक्स करा. सुकामेवा घालून बाजूला ठेवा.
उकडीची पारी बनवणे:
एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी, दूध, तूप आणि मीठ घालून उकळी आणा. उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ हळूहळू टाका आणि एका मोठ्या चमच्याने किंवा लाटण्याच्या दांड्याने पटापट ढवळत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. पीठ एकत्र गोळा झाल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2-3 मिनिटे शिजू द्या. नंतर हे मिश्रण एका मोठ्या परातीत काढून घ्या. गरम असतानाच हाताला तूप लावून पीठ चांगले मळून घ्या, जेणेकरून ते मऊ आणि गुळगुळीत होईल.
advertisement
मोदक बनवणे: मळलेल्या पिठाचा छोटा गोळा घ्या आणि त्याची पारी (पुरीसारखी) तयार करा. कडेने पातळ आणि मध्यभागी थोडी जाड ठेवा. त्यात तयार सारण भरा आणि पारीला कळ्या पाडत मोदकाचा आकार द्या.
advertisement
वाफवणे: स्टीमरमध्ये किंवा चाळणीत पाणी गरम करा. मोदक प्लेटवर ठेवून 10-15 मिनिटे वाफवून घ्या.
टिप -
1. चाळणीला तेल किंवा तूप लावल्यास मोदक चिकटत नाहीत.
2. एखादा मोदक बनवताना फुटला असेल तर तो वाफ देण्यासाठी एकत्र ठेवू नका.
पूर्ण मोदक लालसर होऊन चिकट होतात.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 7:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Modak Recipe : गणेश जयंतीला बनवा साजूक तुपातले उकडीचे मोदक, या पद्धतीनं अजिबात नाही फुटणार, रेसिपीचा Video








