बाप्पाच्या या मंदिरावरूनच इथल्या संपूर्ण वस्तीला 'गणेशवाली' असं नाव देण्यात आलं आहे. तिळा गणपती मंदिराचे पुजारी उत्तम भडके यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
नाशकात वास्तव्यास आलेल्या दामोदर दगडूशेठ सोनार यांना सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी आपल्या घराच्या बांधकामात पाया खोदताना डाव्या सोडेची स्वयंभू गणेश मूर्ती सापडली होती. मग त्यांच्या अगदी घरासमोरच या मूर्तीची स्थापना करण्यात आली. बाप्पासाठी एक मोठं भव्य मंदिर बांधण्यात आलं. गेल्या 8 पिढ्यांनी या गणरायाची नित्यनेमानं सेवा केली, जी अविरत सुरू आहे.
advertisement
बाप्पाची ही डाव्या सोंडेची मूर्ती स्वयंभू मानली जाते. काळ्या पाषाणाची ही मूर्ती अतिशय सुंदर दिसते. विशेष म्हणजे दर संक्रांतीनंतर येणाऱ्या तीळ चतुर्थीला हा गणपती तिळीएवढा वाढत असल्याची मान्यता आहे. त्यामुळे बाप्पाचं हे रूप पाहण्यासाठी दर तीळ चतुर्थीला भाविक मोठ्या संख्येनं दर्शन घेण्यासाठी इथं दाखल होतात. तसंच तीळीप्रमाणे वाढत असल्यामुळे या बाप्पाला 'तिळा गणपती' म्हणून ओळखलं जातं.
नेमकं कुठे आहे तिळा गणपतीचं मंदिर?
नाशिकच्या पंचवटी परिसरातील काहीच अंतरावर असलेल्या गणेशवाडीत एका टेकडीवर तिळा गणपतीचं प्राचीन देऊळ आहे.