Ganesh Mythology : कसा झाला गणपतीचा जन्म? गौरी पुत्राच्या जन्माशी संबंधित काही कथा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आज श्रीगणेशाच्या जन्माबाबत असलेल्या पौराणिक कथांविषयी पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया.
advertisement
advertisement
पहिली कथा - वराह पुराणानुसार भगवान शंकराने गणेशाला पंचमहाभूतांचे रूप दिले होते. गणेशजींना एक विशेष आणि अतिशय सुंदर रूप मिळाले होते. देवी-देवतांना गणेशाचे वेगळेपण कळल्यावर गणेश आकर्षणाचे केंद्र तर बनणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटू लागली. तेव्हा शिवाने गणेशाचे पोट मोठे आणि हत्तीचे तोंड केले होते. अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला, अशी एक कथा आहे.
advertisement
दुसरी कथा - शिवपुराणानुसार देवी पार्वतीने आपल्या अंगावरील हळदीचा एक पुतळा तयार केला होता. त्यांनी नंतर पुतळ्यात प्राण आणले. अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला. यानंतर माता पार्वतीने गणेशाला घराच्या दारातून कोणालाही आत येऊ देऊ नये, अशी आज्ञा केली. गणेशजी दारात उभे असतानाच शिवाचे आगमन झाले. गणेशाने शंकराला आत जाण्यापासून रोखले. यावर शिवाने क्रोधित होऊन गणेशाचे डोके धडा वेगळे केले.
advertisement
पार्वती बाहेर आली तेव्हा गणेशाला मृत पाहून आक्रोश करू लागली आणि गणेशाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. तेव्हा शिवाने गरुडाला उत्तर दिशेला जाण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की, जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली आहे, त्या बाळाचे डोके आणा. तेव्हा गरुडाने हत्तीच्या बाळाचे डोके आणले. भगवान शिवांनी ते मुलाच्या शरीराला जोडले. त्यात त्यांनी प्राण आणले. अशा प्रकारे गणेशाला हत्तीचे शीर मिळाले.
advertisement