लोकांचा असा विश्वास आहे की रावणाचा वध केल्यानंतर भगवान रामाने मृतदेह विभीषणाला सोपवला पण घाईघाईत ते मृतदेहाचे दहन करायला विसरले. त्यानंतर रावणाचा मृतदेह तसाच पडला. जो आजही तसाच आहे, असं म्हणतात. असाही दावा केला जातो की नाग कुळातील लोकांनी रावणाचा मृतदेह सोबत नेला कारण त्यांचा असा विश्वास होता की रावणाचा मृत्यू तात्पुरता होता.
advertisement
Ramayan : रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामाला दिव्यास्त्र कसं मिळालं होतं, कुणी दिलं होतं?
असं म्हटलं जातं की रावणाचा मृतदेह ममीच्या स्वरूपात ठेवण्यात आला आहे. रावणाच्या मृत शरीरावर असा लेप लावण्यात आला आहे की 10 हजार वर्षांनंतरही तो खराब झालेला नाही. रावणाचा मृतदेह 17 फूट लांब शवपेटीत ठेवण्यात आला आहे. या शवपेटीखाली रावणाचा अमूल्य खजिना आहे असंही म्हटलं जातं. या खजिन्याचं रक्षण एका भयंकर नागाने आणि अनेक धोकादायक प्राण्यांनी केलं आहे.
रावणाचा मृतदेह नेमका आहे कुठे?
श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय रामायण संशोधन केंद्राने रामायणाशी संबंधित 50 ठिकाणं शोधून काढली आहेत. रामायणातही या ठिकाणांचा उल्लेख आहे. यापैकी एक श्रीलंकेतील रग्गल जंगल आहे, ज्याच्या मध्यभागी एक मोठा पर्वत आहे, जिथं रावणाचा मृतदेह ठेवल्याचा दावा केला जातो.
Ramayan : रावणाची मुलगी जिला मानतात सौभाग्याची देवी, मंदिरात होते पूजा, कोण आहे ती?
दाव्यानुसार रावणाचा मृतदेह श्रीलंकेतील रग्गलाच्या जंगलात 8 हजार फूट उंचीवर असलेल्या गुहेत ठेवण्यात आला आहे. येथे धोकादायक प्राण्यांचा सतत धोका असल्याने कोणीही येथे येत नाही.
रावणाने मरताना लक्ष्मणला सांगितल्या 3 गोष्टी
मरताना रावणाने लक्ष्मणाला जीवनाच्या तीन महत्त्वाच्या शिकवणी दिल्या. मरताना रावणाने रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण याला जीवनाची तीन मोठी रहस्ये सांगितली.
1) चांगलं काम लवकरात लवकर पूर्ण करा. कारण जीवन अनिश्चित आहे. विलंबामुळे अनेकदा चांगल्या संधी हुकतात.
2) अगदी लहान आजारही प्राणघातक ठरू शकतो. कमकुवत दिसणारा शत्रूही धोकादायक असू शकतो. रावणाने राम आणि त्याच्या सैन्याला कमी लेखलं, ज्यामुळे त्याचा पराभव झाला.
3) आयुष्याशी संबंधित गुपिते कोणाशीही शेअर करू नका, मग ती कितीही प्रिय असली तरी. रावणाच्या नाभीत लपलेल्या अमृत कुंडाचं रहस्य त्याचा भाऊ विभीषणाला माहीत होते, ज्यामुळे रावणाचा पराभव झाला.