रामायणात भगवान राम यांचा विवाह फक्त सीतेशी झाला होता. रामाला एका समर्पित पतीच्या रूपात दाखवण्यात आलं होतं ज्याने आपल्या पत्नीशिवाय इतर कोणाचाही विचार केला नाही. तथापि अयोध्या आणि इतर राज्यांतील अनेक सुंदर स्त्रिया त्याच्यावर मोहित झाल्या. काहींनी त्याच्यावर प्रेम व्यक्त केलं तर काहींनी त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.
Ramayan : कैकेयीने रामासाठी 14 वर्षांचाच वनवास का मागितला? त्यापेक्षा कमी किंवा जास्त का नाही?
advertisement
देवदत्त पटनायक यांनी त्यांच्या नवीन पुस्तक "सती सावित्री"मध्ये अनेक स्त्रीवादी कथांचा उल्लेख केला आहे ज्या कधीही प्रकाशात आल्या नाहीत. यामध्ये त्यांनी रामाकडे आकर्षित होणाऱ्या महिलांबद्दल सांगितलं आहे. तसंच रामायणातील अरण्यकांडातही याचा उल्लेख आहे. त्यापैकी एक स्त्री आहे वेदवती.
कोण होती वेदवती?
वेदवती ही एक पौराणिक पात्र आहे, जिचा उल्लेख वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडात आहे. ती एक तपस्वी होती, जी भगवान विष्णूची भक्त आणि अत्यंत सुंदर मानली जाते. वेदवती कुशध्वज ऋषींची कन्या होती. ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची पूजा करत होती. तिचं ध्येय भगवान विष्णूला पती म्हणून प्राप्त करणं होतं. यासाठी तिने कठोर तपस्या केली.
मग जेव्हा त्रेतायुगात विष्णूचा अवतार भगवान राम पृथ्वीवर आले तेव्हा वेदवतीने त्यांना पाहिलं. ती त्यांच्याकडे गेली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. वेदवतीने रामाला भगवान विष्णू म्हणून ओळखलं असा उल्लेख आहे. मग रामाने वेदवतीला सांगितलं की यावेळी तो फक्त सीतेचा पती आहे. म्हणून तो या जन्मात तिला स्वीकारू शकत नाही पण पुढच्या जन्मात ती निश्चितच त्याच्या आयुष्यात असेल.
पुढच्या जन्मात राम कृष्णाच्या रूपात पृथ्वीवर आले आणि असं म्हटलं जातं की वेदवती त्यांना पुढच्या जन्मात रुक्मिणीच्या रूपात भेटली.
वेदवतीने रावणाला दिला होता शाप
वेदवतीच्या कथेत एक महत्त्वाचा वळण येतो जेव्हा तिच्या सौंदर्याने मोहित झालेल्या लंकेचा राजा रावणाने तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वेदवतीने रावणाला शाप दिला की तो एका स्त्रीमुळे मरेल. यानंतर वेदवतीने तिच्या पवित्रतेचे रक्षण करण्यासाठी अग्नीत प्रवेश केला. तिने आपले प्राण सोडले.