Mahabharat Ramayan Story : आई नाही वडिलांच्या गर्भातून जन्म झालेला महायोद्धा, रावणालाही चारली होती धूळ

Last Updated:

Mahabharat and Ramayan Story : भारतात असे अनेक महान राजे होऊन गेले आहेत ज्यांच्या शौर्याचे उदाहरण दिलं जातं आणि त्यांच्यासारखा दुसरा राजा झाला नाही. त्यापैकी एक मांधात होता, ज्याचा जन्म त्याच्या आईच्या पोटातून नाही तर वडिलांच्या पोटातून झाला होता.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
नवी दिल्ली : महाभारत आणि रामायण यातील काही पात्र अशी आहेत ज्यांच्या जन्माच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म वेगळ्या पद्धतीने झाला. असाच एक राजा ज्याच्याबाबत सगळ्यांना माहिती नाही. हा राजा एक महायोद्धा होता पण त्याचा जन्म त्याच्या आईच्या नाही तर वडिलांच्या गर्भातून झाला. या राजाची कहाणी आपण पाहुयात.
भागवत पुराणाच्या नवव्या अध्यायाच्या सहाव्या अध्यायात त्याचा उल्लेख आहे. युवानाश्व नावाचा राजा, जो भगवान रामाच्या पूर्वजांपैकी एक होता.  राजा युवनाश्व निपुत्रिक होता. यामुळे दुःखी होऊन तो त्याच्या 100 पत्नींसह वनात गेला. तिथं ऋषींनी राजा युवनाश्व आणि त्याच्या पत्नींसह पुत्रप्राप्तीसाठी भगवान इंद्राचा यज्ञ केला.
एके दिवशी रात्री राजा युवनाश्वला खूप तहान लागली. तो यज्ञशाळेत गेला, तिथं त्याने पाहिलं की सर्व ऋषी झोपलेले आहेत. राजाला ऋषींना झोपेतून उठवणं आवडत नव्हतं. पण तो खूप तहानलेला होता आणि जेव्हा त्याला पाणी मिळवण्याचा दुसरा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा तो यज्ञात ठेवलेल्या भांड्यातून पाणी प्यायला. त्याला माहित नव्हतं की ते पाणी मंत्रांनी पवित्र केलं गेलं आहे. सकाळी जेव्हा ऋषी जागे झाले तेव्हा यज्ञेत ठेवलेल्या भांड्यात पाणी नाही हे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी सगळ्यांना याबाबत विचारलं. राजा युवनाश्वाने पाणी प्यायल्याचं त्यांना समजलं.  हे पाणी प्यायल्याने राजा युवनाश्व गर्भवती झाला.
advertisement
युवनाश्व मुलाला जन्म दिला, इंद्राने दूध पाजलं
9 महिन्यांनी प्रसूतीची वेळ आली तेव्हा युवानाश्वाचा उजवा गर्भाशय फाडून एका चक्रवर्ती मुलाचा जन्म झाला. तो सतत रडत होता, त्यामुळे ऋषीमुनी काळजीत पडले आणि त्यांनी सांगितलं की बाळ दुधासाठी रडत आहे, तो कोणाचं दूध पिणार? मग इंद्र समस्या सोडवण्यासाठी पुढे आला. त्याने त्याची तर्जनी मुलाच्या तोंडात घातली. अशाप्रकारे बाळाचं नाव 'मांधात' ठेवण्यात आलं ज्याचा अर्थ आहे- 'मी (आईच्या अनुपस्थितीत) गर्भ धारण केलेला'. कारण इंद्राने त्याला वाढवलं.
advertisement
मांधाताचं नाव 'त्रसदस्यु' ठेवण्यात आलं
भागवत पुराणानुसार, मांधात एक पराक्रमी आणि चक्रवर्ती राजा बनला. त्याने संपूर्ण पृथ्वीवर एकट्याने राज्य केलं. सूर्योदयापासून ते मावळत्या ठिकाणापर्यंतचा संपूर्ण प्रदेश युवनाश्वाचा मुलगा मांधाताच्या ताब्यात होता. तो आत्मज्ञानी होता, त्याने दक्षिणा घेऊन मोठे यज्ञ केले ज्याद्वारे तो परमेश्वराची पूजा करत असे. तो इतका शक्तिशाली झाला की रावणालाही त्याची भीती वाटायची! म्हणूनच इंद्राने त्याचे नाव 'त्रसदस्यु' ठेवलं कारण तो 'दस्यु' म्हणजे वाईट लोकांसाठी मृत्युसारखा होता. वाईट लोक त्याला अत्यंत घाबरत होते.
advertisement
भगवान रामाच्या पूर्वजांच्या काळात रावण कसा होता?
आता जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की रावणाला भगवान रामाने मारले होते, तर त्रसदस्युच्या काळात तो कसा होता! तर रावणाला 10 डोकी होती आणि तो त्रेता युगाच्या शेवटच्या टप्प्याच्या सुरुवातीला जन्माला आला होता. रावण संहितेतच उल्लेख आहे की रावणाने त्याच्या भावांसह 10 हजार वर्षे ब्रह्माजींसाठी तपश्चर्या केली. त्याने ब्रह्माजींना आपले डोकं अर्पण करण्यास सुरुवात केली. दर 1000 व्या वर्षी त्याने आपल्या एका डोक्याचा त्याग केला, त्याचप्रमाणे जेव्हा त्याने आपले दहावं डोकं अर्पण करण्यास सुरुवात केली तेव्हा ब्रह्माजी प्रकट झाले. रावणाने त्याच्याकडून एक वर मागितला.
advertisement
वर मिळाल्यानंतर तो जगात विनाश पसरवू लागला. अनेक देव, राक्षस, यक्ष आणि योद्ध्यांना पराभूत करून रावण भगवान शिव यांच्याकडे पोहोचला तेव्हा त्याने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला. त्याचे हात तिथेच अडकले. मग त्याने 1000 वर्षे भगवान शिवाची प्रार्थना केली. भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान दिलं. अशाप्रकारे रावण खूप शक्तिशाली आणि मायावी बनला. त्याला वरदान मिळण्यास 11 हजार वर्षांहून अधिक काळ लोटला होता. लंकेतील त्याचं राज्य 72 चौकडींचं होतं. एका चौकडीत एकूण 400 वर्षे असतात, म्हणजे 72×400 = 28800 वर्षे. जर आपण 10000+1000+28800 जोडले तर ते सुमारे 40 हजार वर्षे होतात. 41000 व्या वर्षी, तो भगवान रामाला भेटला आणि मारला गेला.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat Ramayan Story : आई नाही वडिलांच्या गर्भातून जन्म झालेला महायोद्धा, रावणालाही चारली होती धूळ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement