Ramayan : कैकेयीने रामासाठी 14 वर्षांचाच वनवास का मागितला? त्यापेक्षा कमी किंवा जास्त का नाही?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ramayan Story : दशरथने कैकेयीला दोन वर देण्याचं वचन दिले जे राणीने भविष्यासाठी राखून ठेवलं. हेच वचन मागताना तिने रामासाठी 14 वर्षांचा वनवास मागितला होता.
नवी दिल्ली : रामायणाच्या कथेत कैकेयीचे पात्र म्हणजे एखाद्या व्हिलनसारखं आहे. तिचं पात्र इतिहासाच्या पानांवर छाप सोडतं. तिने मागितलेले दोन वर जे भगवान रामाच्या 14 वर्षांच्या वनवासाचं कारण बनलं ते अजूनही गूढ आणि आश्चर्याचा विषय आहेत. तिनं रामासाठी 14 वर्षांचाच वनवास का मागितला असासुद्धा प्रश्न पडतो.
ही कथा देव आणि असूर युद्धात राजा दशरथ देवांना मदत करत असतानाची आहे. युद्धभूमीत जेव्हा त्यांच्या रथाचं चाक खराब झालं तेव्हा कैकेयीने ते आपल्या हाताने धरून राजाचा जीव वाचवला. या शौर्य आणि निष्ठेमुळे प्रभावित होऊन दशरथने कैकेयीला दोन वर देण्याचं वचन दिले जे राणीने भविष्यासाठी राखून ठेवलं.
रामासाठी मागितला 14 वर्षे वनवास
काळाचं चक्र फिरलं. अयोध्येत रामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. मग कैकेयीची दासी मंथरा, जी तिच्या धूर्त बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध होती, तिने राणीच्या मनात मत्सर आणि संशयाचं बीज पेरले. तिने कैकेयीला आठवण करून दिली की राजा दशरथने तिला दोन वर देण्याचं वचन दिलं होतं आणि ते वापरण्याची हीच योग्य वेळ होती. मंथराने कैकेयीला भरतसाठी सिंहासन आणि रामासाठी चौदा वर्षांचा वनवास मागण्यास उद्युक्त केलं.
advertisement
मंथराच्या विषारी शब्दांनी कैकेयी प्रभावित झाली, तिला खूप राग आला. राजा दशरथ तिला शांत करण्यासाठी आला तेव्हा तिने तिचे दोन्ही वर मागितले. रामावर प्राणापेक्षा जास्त प्रेम करणारा राजा दशरथ कैकेयीच्या कठोर निर्णयाने अत्यंत अस्वस्थ झाला. त्याचं हृदय वेदनेने भरलं होतं पण तो त्याच्या शब्दाने बांधला गेला. शेवटी त्याला रामाला वनवासात पाठवावं लागलं आणि भरतला सिंहासन सोपवावं लागलं.
advertisement
14 वर्षे का निवडण्यात आली?
त्रेतायुगात असा नियम होता की जर राजा 14 वर्षे आपल्या राज्यापासून दूर राहिला तर तो त्याच्या सिंहासनाचा अधिकार गमावेल. म्हणून कैकेयीने रामासाठी 14 वर्षांचा वनवास मागितला, जेणेकरून रामाचा अधिकार संपेल. परंतु भरतने रामाच्या जागी राज्य ताब्यात घेऊन ही योजना उधळून लावली.
कैकेयीने रघुवंशाच रक्षण केलं?
या घटनेमागे अनेक रहस्ये आणि खोल अर्थ लपलेले आहेत. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की कैकेयीला केवळ मंथराने दिशाभूल केली होती तर काहींचा असा विश्वास आहे की तिने हे कठोर पाऊल उच्च हेतूसाठी उचललं.
advertisement
एका लोकप्रिय समजुतीनुसार, कैकेयीला रघुवंशांच्या रक्षणाची काळजी होती. असं म्हटलं जातं की राजा दशरथाने श्रवणकुमारला अजाणतेपणे मारलं होतं, ज्यामुळे श्रवणकुमारच्या वडिलांनी दशरथला पुत्र वियोगाचा शाप दिला होता. राजा अश्वपतीची कन्या कैकेयी ज्योतिष आणि भविष्यवाण्यांमध्ये पारंगत होती. तिला माहित होतं की जर दशरथच्या मृत्यूनंतर 14 वर्षांच्या आत राजकुमार सिंहासनावर बसला तर रघुवंश गंभीर संकटात पडेल. म्हणूनच, रामाला वनवासात पाठवून कैकेयीने प्रत्यक्षात रघुवंशाचं रक्षण केलं.
Location :
Delhi
First Published :
June 06, 2025 6:01 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ramayan : कैकेयीने रामासाठी 14 वर्षांचाच वनवास का मागितला? त्यापेक्षा कमी किंवा जास्त का नाही?