Ramayan : हनुमानाचं शस्त्र गदा, पण ती त्याला कुणी दिली होती?

Last Updated:

Ramayan Story : हनुमानजींची गदा आजही त्यांच्या भक्तांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांना शक्ती, भक्ती आणि विजयाचा मार्ग दाखवते. पण तुम्हाला माहिती आहे का बजरंगबलीला ही गदा कोणी दिली?

News18
News18
नवी दिल्ली : हनुमानजी ज्यांना बजरंगबली असंही म्हणतात, तो त्याच्या अफाट शक्ती, भक्ती आणि ब्रह्मचर्य यासाठी ओळखला जातो. हनुमानाच्या फोटोमध्ये अनेकदा तो त्याच्या शक्तीचं प्रतीक असलेली गदा घेऊन दाखवला जातो. जे त्याचं शस्त्र. पण तुम्हाला माहिती आहे का हनुमानाला ही गदा कोणी दिली होती?
हनुमानाची गदा केवळ एक शस्त्र नाही तर ती त्यांच्या भक्तांसाठी एक संरक्षक कवच देखील आहे. असं मानलं जातं की जो कोणी भक्त खऱ्या मनाने हनुमानजीची पूजा करतो त्याचे रक्षण स्वतः बजरंगबली करतात. हनुमान नेहमी त्याची गदा डाव्या हातात धरतो म्हणून त्याला 'वामहस्तगदायुक्तम्' असंही म्हणतात. ज्याचा अर्थ 'डाव्या हातात गदा धरणारा' असा होतो. या गदाला 'कौमोदकी' असेही म्हणतात. 'कौमोदकी' म्हणजे 'मनाला मोहित करणारी'.
advertisement
पौराणिक कथेनुसार, हनुमानजींची गदा त्यांना धनदेवता कुबेराने भेट म्हणून दिली होती. यक्षांचा राजा म्हणून ओळखला जाणारा कुबेर हा देवांचा खजिनदार आहे आणि त्याला संपत्तीचा स्वामी मानलं जातं. पौराणिक कथेनुसार, हनुमान लहान असताना, त्याच्या अद्भुत शक्ती आणि भक्तीने प्रभावित होऊन कुबेराने त्याला ही गदा भेट दिली. हनुमानाला ही गदा देताना कुबेरने त्याला आशीर्वाद दिला की या गदाने तो प्रत्येक युद्धात विजयी होईल. या वरदानामुळे हनुमानाची गदा आणखी शक्तिशाली आणि महत्त्वाची बनली.
advertisement
काही कथांमध्ये असंही नमूद आहे की ही गदा प्रत्यक्षात भगवान विष्णूची आहे, ज्याचा एक भाग कुबेराने हनुमानाला भेट म्हणून दिला होता. अशाप्रकारे ही गदा केवळ कुबेराची देणगी नाही तर त्यात भगवान विष्णूच्या शक्तीचा एक भागदेखील आहे.
advertisement
अशाप्रकारे हनुमानाची गदा केवळ त्याच्या शारीरिक शक्तीचं प्रतीक नाही तर ती कुबेराच्या आशीर्वादाचं आणि भगवान विष्णूच्या कृपेचंदेखील प्रतीक आहे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची पुष्टी करत नाही किंवा याचं समर्थन करत नाही. तसंच कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश न्यूज18मराठीचा नाही.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ramayan : हनुमानाचं शस्त्र गदा, पण ती त्याला कुणी दिली होती?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement