असे मानले जाते की, प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर काही खास वस्तू अर्पण केल्याने महादेवांचा आशीर्वाद मिळतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात. उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांनी सांगितले आहे की, प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण करणे शुभ असते. याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी 'रवि प्रदोष' येत असल्यामुळे हे उपाय अधिक फलदायी ठरणार आहेत.
advertisement
प्रदोष व्रत कधी आहे?
वैदिक पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी 8 जून रोजी सकाळी 07 वाजून 17 मिनिटांनी सुरू होईल. ही त्रयोदशी तिथी 9 जून रोजी सकाळी 09 वाजून 35 मिनिटांनी संपेल. सनातन धर्मात उदया तिथी मानली जाते, त्यामुळे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाचे प्रदोष व्रत 8 जून रोजी पाळले जाईल. या दिवशी रविवार असल्यामुळे याला 'रवि प्रदोष व्रत' असे म्हटले जाईल. या दिवशी भगवान शिवाच्या पूजेसाठी शुभ वेळ संध्याकाळी 07 वाजून 18 मिनिटांपासून रात्री 09 वाजून 19 मिनिटांपर्यंत आहे.
प्रदोष व्रताच्या दिवशी करा हे उपाय
पूत्र सुखासाठी : प्रदोष व्रताच्या पूजेदरम्यान शिवलिंगावर गहू आणि धोतरा अर्पण करा. यावेळी महादेवाला जीवनात सुख-शांती मिळण्यासाठी प्रार्थना करा. धार्मिक मान्यतेनुसार, हा उपाय केल्याने मुलांना सुख मिळते आणि महादेवांचा आशीर्वाद मिळतो.
पापांपासून मुक्तीसाठी : प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर तीळ अर्पण करा. शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने साधकाला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद येतो, अशी श्रद्धा आहे.
धनप्राप्तीसाठी : जर तुम्हाला धन हवे असेल, तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ अर्पण करा. असे केल्याने धनलाभ होतो आणि जीवनातील पैशांची कमतरता दूर होते, अशी मान्यता आहे.
प्रतिष्ठेसाठी : भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर लाल चंदन अर्पण करा. हा उपाय केल्याने कुंडलीतील सूर्य मजबूत होतो आणि व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते, अशी श्रद्धा आहे. यामुळे तुमच्या कामांमध्ये यश मिळते.
हे ही वाचा : डोळे, फणा, रंग, दात... आत्ताच माहिती करून घ्या 'या' गोष्टी, पुन्हा कधीच वाटणार नाही सापाची भीती!
हे ही वाचा : आजचं राशीभविष्य: कुणाला व्यवसायात संधी, कुणावर पैशांचा पाऊस, आज पालटणार नशीब!