स्वप्नात आग दिसण्याचे 4 मोठे संकेत -
ऑफिस किंवा दुकानात आग पाहणे: स्वप्नात आग पाहणे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही घटना दर्शवते. यासाठी, तुम्ही तुमच्या स्वप्नात आगीची घटना कोठे पाहत आहात हे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला स्वप्नात तुमचे दुकान किंवा कार्यालय जळताना दिसले तर ते तुमच्या प्रगतीचे संकेत देते. जर तुम्ही व्यापारी असाल तर व्यवसायात नफा होऊ शकतो आणि जर तुम्ही नोकरी करत असाल तर पदोन्नती किंवा वेतनवाढ शक्य आहे.
advertisement
स्वतःला आगीत अडकलेले पाहणे: जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात भीषण आग दिसली तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. वास्तविक या प्रकाराचा अर्थ असा होतो की, तुमचा मानसिक ताण आता संपुष्टात आला आहे. तुम्ही परदेश प्रवास करू शकाल. याशिवाय, जर तुम्ही स्वप्नात स्वतःला आगीच्या मध्यभागी अडकलेले दिसले आणि स्वतःला वाचवू शकत नसाल तर याचा अर्थ असा आहे की, तुमच्या शरीरात पित्ताची समस्या वाढू शकते. असे स्वप्न दिसल्यास आरोग्य तपासणी करून घेणे चांगले.
या राशींवर शनीची असते विशेष कृपा; साडेसाती, महादशेतही शुभ गोष्टी घडून येतात
स्वतःला आग विझवताना पाहणे: स्वप्नात आग विझवताना पाहणे हे जीवनात येणाऱ्या नकारात्मक घटनांचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत सावधगिरीने काम करणे आवश्यक आहे. तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर याचा अर्थ असा आहे की, तुमचे कोणाशी तरी संबंध खराब होऊ शकतात. अशा प्रकारची परिस्थिती कुटुंबातील लोकांसोबतही होऊ शकते. यासाठी तुम्ही स्वतःवर संयम ठेवणे चांगले.
तुमच्या घरात आग दिसणे: स्वप्नात तुमच्या घरात आग लागल्याचे दिसले तर काळजी करण्याऐवजी तुम्ही आनंदी राहण्याची गरज आहे. असे स्वप्न पाहिल्यानंतर बरेच लोक घाबरतात. पण, आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला स्वप्नात तुमचे घर जळताना दिसले तर ते संकट दूर होण्याचे संकेत आहे. खरं तर या प्रकारच्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, लवकरच तुमच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या हव्या त्या जीवनसाथीचा शोध पूर्ण होऊ शकतो.
या जन्मतारखांची जोडी जमली तर प्रगती ठरलेली! पण, प्रेमात नसते इमोशनल अटॅचमेंट
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
