श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित केला जातो. अनेक भाविक या महिन्यात महादेवाची पूजा-अर्चना करत असतात. तसेच अनेक भाविक केस आणि नखे कापू नये असे सुचवत असतात. तर यामागे धार्मिक कारण असे आहे, महादेव हे जटाधारी आहेत, केसहीन आहेत. केसांमुळे सौंदर्य टिकते तर आपले आराध्य हे जटाधारी आहेत. याकरिता त्यांची देखील पूजा आपण देवासारखे बनून करावी असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्याचबरोबर केस कापल्याने आपला व्रत खंडित देखील होत असते, असं महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री सांगतात.
advertisement
Skin Care Routine : वाढत्या वयातही त्वचा राहील चिरतरुण! फॉलो करा हे 6 स्टेप्सचे स्किन केअर रूटीन!
पण याचबरोबर काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत. जसे की या महिन्यात पावसाचे प्रमाण हे जास्त असते. तसेच या महिन्यातील वातावरण देखील बदललेले असते. तर पावसाच्या पाण्यामुळे आपली त्वचा ही कोमल होत असते, नाजूक पडत असते. यामुळे आपल्या शरीराला इजा पोहोचू शकते. आपण केस कापताना धारदार शस्त्राचा वापर करत असतो. यामुळे देखील श्रावणात केस कापू नये असे सांगण्यात येत असते, असं डॉ. अनिकेत शास्त्री सांगतात.
श्रावणात केस न कापण्यामागे आजही आध्यात्मिक कारण असल्याचे समजले जाते. तसेच अनेक लोक या महिन्यात नखेही कापत नाहीत, मांसाहार करीत नाहीत. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे अनेकांना या गोष्टी करणे योग्य वाटत नाही, असंही डॉ. अनिकेत शास्त्री यांनी सांगितले.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





