TRENDING:

Shree Swami Samarth : स्वप्नात आले स्वामी समर्थ, याचा अर्थ काय? हा कसला संकेत?

Last Updated:

Shree Swami Samarth Dream Meaning : श्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नात दिसणं ही एक भाग्याची आणि शुभ बाब मानली जाते. स्वप्नात स्वामी समर्थ दिसण्याचे अर्थ वेगवेगळे आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आपण झोपलो की आपल्याला काही ना काही स्वप्न पडतात. काही स्वप्न चांगली असतात, तर काही वाईट. प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. समजा स्वप्नात स्वामी समर्थ आले तर... अनेकांना असं स्वप्न पडलं असेल. स्वामी समर्थांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिलं असेल. पण स्वामी समर्थ स्वप्नात दिसणं म्हणजे याचा अर्थ काय? हा कसला संकेत आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
News18
News18
advertisement

कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नात दिसणं ही एक भाग्याची आणि शुभ बाब मानली जाते. फक्त स्वामी समर्थच नव्हे तर स्वामींशी संबंधित असलेला वटवृक्ष दिसणं हेही अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं. स्वप्नात स्वामी समर्थ दिसण्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. जे जाणून घेण्याआधी स्वप्नात स्वामी दिसल्यावर काय करायचं ते जाणून घेऊ.

advertisement

स्वामी समर्थ स्वप्नात आल्यावर काय करावं?

स्वामी महाराजांनी स्वप्नात दर्शन दिलं आणि जाग आल्यावर ते स्वप्न स्पष्टपणे लक्षात असेल तर लगेच स्वामींची जमेल तशी सेवा करावी.

स्वप्नात स्वामी दिसल्यानंतर त्यांना आदराने नमस्कार करा, त्यांच्यावर प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करा.

Shree Swami Samarth : 'श्री स्वामी समर्थ' जप करताय, पण याचा अर्थ माहितीये का?

advertisement

स्वप्नात स्वामी दिसल्यानंतर त्यांच्या चरणी प्रार्थना करा, स्वामी नामाचा जप करा.

स्वामींनी स्वप्नात येऊन जे मार्गदर्शन केलं असेल, जो स्वामी आदेश झाला असेल किंवा जो सल्ला दिला असेल तर तो अत्यंत प्रामाणिकपणे, मनापासून, श्रद्धेने, निष्ठेने आणि पूर्ण समर्पित भावनेने पाळावा.

स्वप्नात स्वामी दिसण्याचा नेमका अर्थ काय?

advertisement

स्वप्नात स्वामींचं दर्शन म्हणजे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याचे शुभ संकेत आहेत. जीवनात शुभता येणं, शुभ घटना घडणं याचं ते द्योतक मानलं जातं.

स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि तुम्हाला अडचणीच्या काळात मदत करतील, असा विश्वास हे स्वप्न देतं. समस्या, अडचणी दूर होऊ शकतात आणि जीवनाचं सार्थक होऊ शकतं, असाही यामागील एक अर्थ असू शकतो, असं म्हटलं जातं.

advertisement

स्वामी तुमच्यावर कृपा करत असल्याचे हे संकेत मानले जातात. तसंच स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत, असाही एक अर्थ सांगितला जातो.

स्वप्नात स्वामी दिसणं हे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला बळ देण्याचाही एक संकेत आहे. हे तुमच्या मनात असलेल्या श्रद्धा आणि तयार झालेल्या भावनिक बंधाचं प्रतीक असू शकतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना, फक्त दीड रुपये किलोने खरेदी, कांद्याला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ही माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. न्यूज18मराठीने सदर दाव्यांची पुष्टी केलेली नाही. ही फक्त माहितीसाठी देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Shree Swami Samarth : स्वप्नात आले स्वामी समर्थ, याचा अर्थ काय? हा कसला संकेत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल