Shree Swami Samarth : 'श्री स्वामी समर्थ' जप करताय, पण याचा अर्थ माहितीये का?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Shree Swami Samarth Meaning : श्री स्वामी समर्थ असं सर्वच स्वामी भक्त नेहमी नामस्मरण करत असतात. परंतु नाम घेताना त्याचा अर्थ जाणून घेऊन केला तर तो अधिक उपयुक्त आणि श्रेयस्कर ठरतो, असं सांगितलं जातं.
मुंबई : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थांच्या नामाचा हा जप सर्वच स्वामी भक्त नेहमी करतात. पण हे नामस्मरण करत असताना याचा नेमका अर्थ काय? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाम घेताना त्याचा अर्थ जाणून घेऊन केला तर तो अधिक उपयुक्त आणि श्रेयस्कर ठरतो, असं सांगितलं जातं.
'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचं नाव नाही, तर ब्रह्मण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. 'ॐ नमः शिवाय', 'दूं दूर्गायै नमः', ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे ‘श्री स्वामी समर्थ' हा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्याचा जप करावा. नाम घेताना त्याचा अर्थ जाणून घेऊन केला तर तो अधिक उपयुक्त आणि श्रेयस्कर ठरतो, असं सांगितलं जातं.
advertisement
श्री स्वामी समर्थ नामाचा अर्थ
'श्री' म्हणजे स्वयं श्रीपदाविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज.
'स्वामी' शब्दाची फोड स्वाः+मी. यातील स्वाः म्हणजे भस्म करणं अथवा आत्मसमर्पित करणं असा आहे. मी
म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छ्या...! अर्थात माझा मीपणा स्वाः करा.
advertisement
'समर्थ' म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा ...! त्यायोगे 'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिव तत्व सद्गुरुकृपे अंकित करा.
advertisement
स्वामी समर्थ नामस्मरणाचे फायदे
संपूर्ण विश्व हे स्पंदनशील आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू स्पंदनाचा समूह आहे, त्यापैकीच एक मनुष्य. पूर्वजन्मातील कर्मानुसार काही लहरी शुद्ध तर काही अशुद्ध आहेत. माणसाच्या मनात चांगल्यावाईट गोष्टींचा गोंधळ असतो. तो क्षणात भावुक तर क्षणात रागिष्ट होतो. म्हणून प्राचीन ऋषींनी मानवाला ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण, ध्यान, स्तोत्रपठण, चिंतन, ग्रंथवाचन, संत सहवास करण्याचा मंत्र दिला होता. यामुळे आपली स्पंदनं शुद्ध होतात. आपल्यातील दोष निघतात आणि आपण शुद्ध होता.
advertisement
नामस्मरणाने एकाग्रता वाढते, चित्त शुद्ध होते, वाचाशुद्धी प्राप्त होईल शकते, दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही, मन आनंदी राहते, सदैव देवतेचं स्मरण केल्याने आपल्या इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात. माणूस लोभी होत नाही, मन प्रसन्न राहतं.
advertisement
श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना, तारक भाव येण्यासाठी या सर्व शब्दांवर जोर द्यावा आणि आपण स्वामींना शरण जात आहोत असा भाव मनात ठेवावा.
स्वामी समर्थांचा जप कसा करावा?
स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ वापरू शकता. श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्रांचा तुम्ही एका दिवसांत कितीही माळा जप करू शकता. जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र म्हणू शकता.
advertisement
(सूचना : हा लेख सर्वसामान्य धार्मिक माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा न्यूज18मराठीचा उद्देश नाही.)
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
August 04, 2025 6:01 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shree Swami Samarth : 'श्री स्वामी समर्थ' जप करताय, पण याचा अर्थ माहितीये का?