Candela Boats: ना लाटांचे धक्के जाणवणार, ना कुठला आवाज! मुंबईच्या समुद्रात येतेय 'फ्लाईंग बोट', PHOTOS समोर

Last Updated:
एकावेळी ३० प्रवासी वाहून नेण्याची इलेक्ट्रिक बोटीची क्षमता आहे. मेरिटाइम बोर्डाकडून १५ इलेक्ट्रिक बोटींची ऑर्डर देण्यात आली आहे.
1/9
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर आजपर्यंत तुम्ही अलिबागला जाणाऱ्या जुन्या बोटी पाहिल्या असतील आणि प्रवासही केला असेल. पण, आता हे चित्र पालटणार आहे.  इलेक्ट्रिक बोटीची आशियातील पहिली प्रवासी वाहतूक सेवा मुंबईत सुरू होणार आहे, मस्त्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी याबद्दल घोषणा केली आहे. यासाठी Candela नावाच्या ईलेक्ट्रिक बोट आता मुंबईच्या समुद्रात उतरणार आहे.

advertisement
2/9
प्रवासी वाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक बोटीची पहिली झलक मंत्री राणेंनी शेअर केली आहे. Candela नावाची ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे.  महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि कँडेला कंपनीच्या माध्यमातून ही सेवा चालणार आहे.

3/9
गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबागपर्यंत बोट सेवा चालणार आहेत. गेट वे ऑफ इंडिया येथून डिसेंबरमध्ये ही प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल.

4/9
एकावेळी ३० प्रवासी वाहून नेण्याची इलेक्ट्रिक बोटीची क्षमता आहे.  मेरिटाइम बोर्डाकडून १५ इलेक्ट्रिक बोटींची ऑर्डर देण्यात आली आहे.  लवकरच प्रवासी वाहतुकीच्या तिकिट दराबाबत निर्णय होणार आहे.

5/9
विशेष म्हणजे,  कॅंडेला (Candela) ही स्वीडिश कंपनीने बनवलेली एक अत्याधुनिक इलेक्ट्रिक बोट आहे, जी तिच्या खास तंत्रज्ञानामुळे खूप प्रसिद्ध आहे. ही सामान्य बोट नसून, ती पाण्यावर 'उडून' चालते, त्यामुळे तिला 'फ्लाईंग बोट' असंही म्हणतात.

6/9
ही कॅंडेला बोटीमध्ये खाली दोन लांब 'फॉइल्स' (पाण्याखालील पंख किंवा ब्लेड) बसवलेले असतात. बोट एका विशिष्ट वेगावर पोहोचल्यावर, हे फॉइल्स बोटीच्या मुख्य भागाला पाण्याबाहेर उचलतात. यामुळे बोट पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर 'उडते' किंवा 'फ्लाई' होते.

7/9
जेव्हा बोट पाण्यावर उडते, तेव्हा पाण्याचा प्रतिरोध (Drag) खूप कमी होतो. यामुळे कॅंडेला बोट पारंपारिक प्लेनिंग बोटींपेक्षा ८०% पर्यंत कमी ऊर्जा वापरते. कमी ऊर्जेमुळे, एका चार्जमध्ये ही बोट इतर इलेक्ट्रिक बोटींपेक्षा खूप जास्त अंतर कापते.

8/9
विशेष म्हणजे,  या बोटीमध्ये असलेले सेन्सर्स  आणि एक ऑनबोर्ड फ्लाईट कंट्रोलर  बोटीच्या गतीनुसार आणि लाटांनुसार या फॉइल्सची स्थिती प्रति सेकंद १०० वेळा ॲडजस्ट करतात. यामुळे लाटांवरून जात असतानाही प्रवाशांना बोटीत कमी धक्के जाणवतात आणि प्रवास खूप स्थिर आणि आरामदायक होतो.

9/9
हे पूर्णपणे इलेक्ट्रिक इंजिन असल्यामुळे  ते चालताना आवाज करत नाही आणि कोणतेही प्रदूषण (उत्सर्जन) करत नाही.
पाण्याच्या पृष्ठभागावर कमी संपर्क असल्यामुळे, लाटा  देखील खूप कमी निर्माण होतात.
हे पूर्णपणे इलेक्ट्रिक इंजिन असल्यामुळे ते चालताना आवाज करत नाही आणि कोणतेही प्रदूषण (उत्सर्जन) करत नाही. पाण्याच्या पृष्ठभागावर कमी संपर्क असल्यामुळे, लाटा देखील खूप कमी निर्माण होतात.
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement