Astrology: तब्बल 24 दिवस टेन्शन-गोंधळात जाणार! मकर राशीतील शुक्र गोचर 5 राशींना भयंकर त्रासाचे

Last Updated:
Shukra Gochar January 2026 Negative Zodiac Effects: ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थितीला महत्त्व आहे. सुख आणि सुविधांचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह दिनांक 13 जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र 13 जानेवारीला पहाटे 04:02 वाजता मकर राशीत जाईल आणि 6 फेब्रुवारीला पहाटे 01:15 पर्यंत त्याच ठिकाणी असेल. या 24 दिवसांच्या कालावधीत शुक्राच्या गोचराचा 5 राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
1/6
या राशींच्या लोकांच्या नोकरी, व्यवसाय आणि सुखाच्या साधनांवर काही संकटे येऊ शकतात, शिवाय त्यांनी आरोग्याबाबतही सावध राहणे गरजेचे आहे. मकर राशीतील शुक्राच्या या गोचरचा 5 राशींवर होणारा अशुभ प्रभाव सविस्तर जाणून घेऊ

advertisement
2/6
शुक्राच्या या गोचरमुळे मिथुन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचा कामाशी संबंधित ताण वाढू शकतो, तर व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळवण्यात अडचणी येतील. याशिवाय या काळात खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

3/6
कर्क राशीच्या लोकांसाठी हे गोचर आव्हानात्मक ठरू शकते, खासकरून जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ही वेळ कठीण असेल. नफ्यात घट होण्याची शक्यता असून शारीरिक आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. प्रामुख्याने गुडघे आणि सांधेदुखीच्या समस्या उद्भवू शकतात.

4/6
शुक्र गोचरमुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कामाचे स्वरूप खूप धावपळीचे राहील. काही लोक नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. व्यावसायिकांना त्यांचा नफा वाढवण्यासाठी व्यवसायाच्या पद्धतीत धोरणात्मक बदल करावे लागतील. पायांशी संबंधित आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

5/6
धनु राशीच्या लोकांसाठी शुक्राचे मकर राशीतील आगमन काही अडचणी घेऊन येऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाचा मोठा दबाव जाणवेल. याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही होऊ शकतो, विशेषतः विवाहित जोडप्यांमध्ये काही कारणावरून मनमुटाव किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

6/6
या काळात कुंभ राशीचे नोकरीपेशा लोक सध्याच्या कामावर असमाधानी असल्याने नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. व्यावसायिकांना त्यांचे नफ्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल. मात्र, या सर्व काळात तुमचे कौटुंबिक जीवन शांततेचे आणि सहकार्याचे राहील, ही तुमच्यासाठी जमेची बाजू असेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

परळीत मोठा ट्विस्ट!  MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या बालेकिल्ल्यात खळबळ
परळीत मोठा ट्विस्ट! MIM ची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, मुंडेंच्या ब
  • अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाल्याचा धक्का राजकीय धुरिणांना बसला

  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण पाहायला भेटले आहे

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने गटनेता निवडीत युती केली

View All
advertisement