मुंबईतून 17 वर्षांच्या मुलीचं अपहरण, 8 महिने शोध, एक‘इन्स्टा’ पोस्ट अन्...., आसाममध्ये CID पेक्षा थरारक रेस्क्यू

Last Updated:

Mumbai News: चौकशीतून मुलीकडे स्वतःचा मोबाइल नसला, तरी ती इतरांच्या मोबाइलवरून इन्स्टाग्राम वापरत असल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली.

मुंबईतून 17 वर्षांच्या मुलीचं अपहरण, 8 महिने शोध, एक‘इन्स्टा’ पोस्ट अन्...., आसाममध्ये CID पेक्षा थरारक रेस्क्यू
मुंबईतून 17 वर्षांच्या मुलीचं अपहरण, 8 महिने शोध, एक‘इन्स्टा’ पोस्ट अन्...., आसाममध्ये CID पेक्षा थरारक रेस्क्यू
मुंबई: आठ महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. महाराष्ट्र, आसाम आणि तामिळनाडू या तीन राज्यांत सलग दहा दिवस राबविण्यात आलेल्या विशेष शोधमोहिमेमुळे मुलगी सापडली. इन्स्टाग्रामवरील सततच्या पोस्ट आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ओशिवरा पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.
अपहरणाची तक्रार आणि तपासाची सुरुवात
22 मे 2025 रोजी रात्री 10 ते 23 मे रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार एका महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात दिली होती. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अपहृत मुलीच्या आधार कार्डवरील पत्त्यानुसार बिहारमधील सासाराम येथे दोन वेळा पोलिस पथक पाठवण्यात आले. मात्र, तेथे कोणताही ठोस पुरावा हाती लागला नाही. यानंतर तपासाची दिशा बदलत मुलीच्या मित्रमैत्रिणींची सखोल चौकशी करण्यात आली.
advertisement
मोबाइल नसतानाही ‘इन्स्टाग्राम’ वापर
चौकशीतून मुलीकडे स्वतःचा मोबाइल नसला, तरी ती इतरांच्या मोबाइलवरून इन्स्टाग्राम वापरत असल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. याच धाग्यावरून पोलिसांनी तांत्रिक तपास अधिक तीव्र केला. तांत्रिक विश्लेषणात सुरुवातीला संबंधित मोबाइलचे लोकेशन आसाममधील काही भागांत दिसून आले. मात्र, मोबाइल बंद झाल्यामुळे तपासात अडथळे निर्माण झाले आणि काही काळ कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही.
advertisement
लोकेशनमुळे वेग घेतलेली शोधमोहीम
27 डिसेंबर रोजी मोबाइल पुन्हा सुरू होताच त्याचे लोकेशन आसाममधील खेरोणी येथे आढळले. यानंतर ओशिवरा पोलिसांचे पथक विमानाने आसामला रवाना झाले. दरम्यान, तपास करत असताना मोबाइलचे लोकेशन तामिळनाडूतील तिरुवेल्लूर जिल्ह्याच्या आसपास आढळल्याने पोलिसांनी तातडीने चेन्नई गाठले.
लांबडिंग रेल्वे स्टेशन परिसरात मुलगी सापडली
इन्स्टाग्रामवरील पोस्ट, तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीचा मेळ घातल्यानंतर अपहृत मुलगी आसाममधील लांबडिंग परिसरात असल्याचा संशय अधिक ठळक झाला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने लांबडिंग रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता सायंकाळच्या सुमारास मुलगी एकटी आढळून आली. महिला पोलिस अंमलदारांच्या मदतीने तिला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार सध्या तिला वन स्टॉप सेंटरमध्ये सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आले आहे.
advertisement
तपास पथकाची भूमिका
या प्रकरणात तामिळनाडू पोलिसांच्या सहकार्याने संशयितांची चौकशी करण्यात आली. ओशिवरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, अंमलदार सिद्धार्थ भंडारे आणि शिपाई रूपाली सूर्यवंशी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
मुंबईतून 17 वर्षांच्या मुलीचं अपहरण, 8 महिने शोध, एक‘इन्स्टा’ पोस्ट अन्...., आसाममध्ये CID पेक्षा थरारक रेस्क्यू
Next Article
advertisement
Raj Thackeray:'वटवृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन...', खदखद सांगत राज ठाकरेंच्या शिलेदाराचा 'जय महाराष्ट्र', बालेकिल्ल्यात धक्का
'वटवृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन...', मनातील खदखद सांगत राज ठाकरेंच्या शिलेदाराच
  • राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे.

  • मराठी बहुल भाग असलेल्या शिवडीत संतोष नलावडे या शिलेदाराने साथ सोडली

  • मनसैनिकांना लिहिलेल्या पत्रात मनातील खदखद व्यक्त करत विषारी इंजेक्शन देऊन...

View All
advertisement