'तू कार्यक्रम करतो, तर आम्ही...', एकेरी उल्लेख करत महेश लांडगेंची अजित पवारांवर जहरी टीका!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांविरोधात थेट दंड थोपाटले आहेत. लांडगे यांनी अजित पवारांवर एकेरी भाषेत टीकास्त्र सोडलं आहे.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीवरून महायुती सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. इथं भाजप विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना बघायला मिळत आहे. इथं प्रचारसभेतून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जहरी टीका करताना दिसत आहे. आता भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांविरोधात थेट दंड थोपाटले आहेत. लांडगे यांनी अजित पवारांवर एकेरी भाषेत टीकास्त्र सोडलं आहे.
अजित पवार यांनी काही वर्षे आधी विजय शिवतारे यांना उद्देशून जोरदार टीका केली होती. आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. तू कसा आमदार होतो, तेच बघतो, अशी टीका अजित पवारांनी केली होती. अजित पवारांच्या याच जुन्या विधानाचा आधार घेत महेश लांडगे यांनी अजित पवारांची मिमिक्री करत जोरदार हल्लाबोल केला आहे. पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही टीका केली.
advertisement
महेश लांडगे काय म्हणाले?
"आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी जर ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो, तर आम्ही काय बांगड्या घातल्यात का? अरे आमच्या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत. आमच्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत. याच तुझा कार्यक्रम करतील. तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या..." अशी टीका महेश लांडगे यांनी केली.
advertisement
"कुणी नादी लागलं तर सोडत नाही"
दुसरीकडे, अजित पवार यांनीही महेश लांडगेंवर अप्रत्यक्ष टीका केली. "आम्ही योग्य माणसाला संधी देण्याचं काम करतो. मी ज्यांना संधी दिली ती माणसं मला सोडून गेली. ती भली ताकदवान असतील, पण ती सोडून गेली. त्यांच्या मुलांवर काय आरोप होते? कशापद्धतीने तुम्ही दादागिरी करता... दहशत निर्माण करता... गुंडगिरी करता... ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात, हे विसरू नका. मी देखील आरे ला कारे करणारा आहे. मी कधी कुणाच्या नादी लागत नाही, पण कुणी माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. त्यामुळे मतदार बंधू भगिनींनो माझी हात जोडून विनंती आहे. मी यशाने हुरळून जाणारा आणि पराभवाने खचून जाणारा कार्यकर्ता नाहीये. मला तशी सवयही नाही" असं अजित पवार म्हणाले.
view commentsLocation :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 11:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तू कार्यक्रम करतो, तर आम्ही...', एकेरी उल्लेख करत महेश लांडगेंची अजित पवारांवर जहरी टीका!









