तेजश्री प्रधाननंतर नॅशनल क्रश गिरिजा ओक घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत, कधी, कुठे?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Girija Oak : अभिनेत्री तेजश्री प्रधाननंतर नॅशनल क्रश गिरिजा ओक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहे. ही मुलाखत कुठे आणि कधी होणार आहे?
advertisement
advertisement
पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर विभागाकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन मांडण्याच्या उद्देशाने 'संवाद पुणेकरांशी' या विशेष संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट पुणेकर नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
advertisement
advertisement
advertisement
भाजपचे राज्य सरचिटणीस राजेश पांडे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं, 'संवाद पुणेकरांशी' हा कार्यक्रम पुणे शहरातील भाजपच्या सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये मोठ्या पडद्यांवर थेट प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित न राहता देखील शहरातील पाच लाखांहून अधिक नागरिक एकाच वेळी हा संवाद पाहू शकतील.
advertisement
तसंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपच्या 'घर चलो' संपर्क अभियानाचीही औपचारिक सुरुवात होणार आहे. दोन दिवसीय मोहिमेअंतर्गत भाजप पुणे शहरातील सुमारे 10 लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान पक्षाचा निवडणूक जाहीरनामा म्हणजेच ‘संकल्पनामा’ नागरिकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे, असंही राजेश पांडे यांनी सांगितलं.










