मजेत च्युइंगम चघळत होता; कोर्टाने सुनावली अशी शिक्षा फुटला घाम, जमिनीवर कोसळला
- Published by:Priya Lad
Last Updated:
दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवादादरम्यान तो आनंदाने च्युइंगम चघळत होता, जणू काही त्याला येणाऱ्या निकालाच्या गांभीर्याची कल्पनाच नव्हती. पण न्यायाधीशांनी त्याला शिक्षा सुनावताच त्याला घाम फुटला.
लखनऊ : 25 जुलै 2025 रोजीची ही घटना. एक 6 वर्षांची मुलगी... पाठीवर स्कूल बॅग, हातात पाण्याची बाटली आणि हसत हसत ती शाळेतून घरी परतत होती. आईने काहीतरी छान छान खायला बनवलं असेल, ते खाणार आणि मी खेळणार हा विचार करत ती जात होती... वाटेत तिला भेटला अमित काका ज्याने तिला कँडीचं आमिष दिलं आणि त्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं.
उत्तर प्रदेशच्या माहोरचा गावातील हे प्रकरण आहे. अमित रायकर नावाचा तरुण ज्याने शाळेतून घरी परतणाऱ्या एका मुलीला दोन रुपयांच्या टॉफीचं आमिष देत 10 रुपयांचा गुटखा मागवण्यासाठी तिला आपल्या घरी बोलावून घेतलं. तिच्या शरीरावर चाव्याच्या खुणा, गंभीर जखमा होत्या. आरोपीच्या घराच्या नाल्यात पोलिसांना मुलीची कापलेली जीभही सापडली. अमितने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता, अत्यंत क्रूर कृत्य केलं.
advertisement
घटनेनंतर रात्री उशिरा पोलिसांनी अमित रायकवारला अटक केली. त्याला तीन दिवस तुरुंगात डांबण्यात आलं. 7 ऑक्टोबर 2025 रोजी कालिंजर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं, ज्यामध्ये त्याच्यावर पोक्सो कायद्याच्या कलम 6 आणि भारतीय दंड संहितेच्या (बीएनएससी) विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले. आरोप निश्चित झाल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी खटला सुरू झाला. 56 दिवसांच्या खटल्यादरम्यान 10 साक्षीदारांना हजर करण्यात आले. यामध्ये पीडितेवर उपचार करणारे तीन डॉक्टरांचं पॅनेल, फॉरेन्सिक, डीएनए आणि वैद्यकीय अहवाल आणि बीएनएससीच्या कलम 180 आणि 183 अंतर्गत नोंदवलेले जबाब यांचा समावेश होता. या सर्व पुराव्यांमुळे आरोपीला दोषी ठरवण्यात आलं.
advertisement
बांदा जिल्हा सत्र विशेष न्यायालयात शिक्षा सुनावण्यात येत असताना, अमितला असं वाटलं की त्याला वाचवलं जाईल. तो पूर्णपणे बेफिकीर उभा राहिला. दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवादादरम्यान तो आनंदाने च्युइंगम चघळत होता, जणू काही त्याला येणाऱ्या निकालाच्या गांभीर्याची कल्पनाच नव्हती. पण न्यायाधीशांनी त्याला शिक्षा सुनावताच त्याला घाम फुटला. तो वारंवार म्हणू लागला, "साहेब, मी काहीही केलं नाही. मी घरी नव्हतो." पण न्यायाधीशांनी ऐकलं नाही. अमितचे हातपाय थरथर कापू लागले. तो जमिनीवरच तो जमिनीवरच कोसळला.
advertisement
अमितला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश प्रदीप कुमार मिश्रा यांनी 46 पानांचा निकाल देताना दोषीला मृत्युदंडापर्यंत फाशी देण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पेनाची निब तोडली. न्यायाधीशांनी यावर भर दिला की असं घृणास्पद गुन्हे करणाऱ्यांना समाजात स्थान नाही. आता अमितचे वडील बाबूलाल यांनी सांगितलं की ते निकालाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात जातील.
advertisement
मुलीवर 3 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ती 17 किंवा 18 वर्षांची झाल्यावर तिचं हिस्टेरेक्टॉमीदेखील केलं जाईल. पण त्या जखमा, वेदना अजूनही ताज्या आहेत. घटनेच्या आठवणी अजूनही कुटुंबाला सतावत आहेत. मुलगी आता शाळेत जात नाही आणि रात्री ओरडत असल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं.
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
Jan 09, 2026 10:31 AM IST










