ऐकावं ते नवल! चोरांच्या घरातच चोरी, तीही पोलिसांनी केली; चोर-पोलिसांचं अजब प्रकरण चर्चेत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Police Become Theft : चोरांना पकडायला त्यांच्या घरी जाताच पोलीसही चोर बनले आहेत. पोलिसांनीच चोरांच्या घरावर डल्ला मारल्याचा आरोप होत आहे.
चोरीची प्रकरणं काही नवीन नाहीत. अगदी पोलिसांच्या घरातही चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. पण आता एक अजब प्रकरण चर्चेत आलं आहे. चक्क पोलिसांनी चोरी केली आहे, तीसुद्धा चोरांच्या घरात. पोलिसांनी चोरांच्या घरात चोरी केली हे वाक्य वाचल्यानंतर कदाचित ही टायपो मिस्टेक वाटेल अशी घटना. पण नाही खरंच असं घडलं आहे.
advertisement
बिहारच्या वैशाली नगरमधील ही घटना आहे. 31 डिसेंबर रोजी लालगंजचे एसडीपीओ गोपाल मंडल यांनी पत्रकार परिषद घेऊन पती-पत्नी चालवत असलेल्या चोरीच्या टोळीचा शोध लावल्याची घोषणा केली. पोलिसांनी बिलानपूर गावातील रामप्रीत साहनीच्या घरावर छापा टाकला होता. चोरीची भांडी, एक टीव्ही, काडतुसे आणि इतर वस्तू जप्त केल्या. छाप्यादरम्यान आरोपीच्या पत्नीलाही अटक करण्यात आली.
advertisement
पण पोलिसांच्या या कारवाईमुळे एक नवीन वाद निर्माण झाला. रामप्रीतचा नातेवाईक गेनालाल साहनीने पोलिसांवर गंभीर आरोप केले. छाप्यादरम्यान पोलिसांनी केवळ भांडी आणि एक टीव्हीच नाही तर घरातून अंदाजे 2 किलो सोनं, 6 किलो चांदी आणि लाखो रुपये रोख रक्कमही जप्त केली. या मौल्यवान वस्तू जप्तीच्या यादीत समाविष्ट नसल्याचा आरोप आहे.
advertisement
advertisement
प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक ललित मोहन शर्मा यांनी लालगंज पोलीस स्टेशनचे अधिकारी संतोष कुमार आणि निरीक्षक सुमन झा यांना निलंबित केलं आहे आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. एसपींनी स्पष्ट केलं आहे की जर आरोप खरं आढळले तर दोषी पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल. (सर्व फोटो प्रतीकात्मक, AI Generated)









