लेकीचं भयानक कांड, आई थेट पोलिसांत, श्रुतीनं इसराईल सोबत..., सोलापुरातील घटनेनं खळबळ
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: श्रुतीच्या आई-वडिलांनी श्रुतीचा शोध घेतला पण ती सापडली नाही. तेव्हा त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
सोलापूर: माय-लेकीचं नातं अतूट मानलं जातं आणि त्याबद्दल खूपदा बोललंही जातं. पण सोलापुरात एका आईने लेकीविरोधात थेट पोलिसांत धाव घेतलीये. कॉम्प्युटर सायन्सच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या श्रुती संतोष शिंदे हिने आईच्या दागिन्यांवरच डल्ला मारला आहे. इसराइल अहमद शेख याच्या सांगण्यावरून ती सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशा 2 लाख 30 हजारांचा ऐवज घेऊन पसार झाली आहे. या प्रकरणात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
सोलापुरातील मजरेवाडी परिसरात 38 वर्षीय रुक्मिणी संतोष शिंदे या पती व दोन मुलींसह राहतात. श्रुती दररोज मजरेवाडी बस स्टॉप येथून बसने कॉलेजला जाते आणि बसनेच घरी परत येते. 12 डिसेंबर 2025 रोजी श्रुती ही सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बसने कॉलेजला गेली. पण संध्याकाळी ती कॉलेज बसमधून घरी आली नाही. त्यावेळी बसच्या ड्रायव्हरला विचारले असता श्रुती ही कॉलेजवरून येत असताना दावत चौकात असलेल्या स्टोअरजवळ उतरल्याचे त्याने सांगितले.
advertisement
शोधाशोध केली पण...
श्रुतीच्या आई-वडिलांनी श्रुतीचा शोध घेतला पण ती मिळून सापडली नाही. तेव्हा त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तेव्हा श्रुतीच्या आई-वडिलांचा संशय कुर्बान हुसेन नगर येथे राहणाऱ्या इसराइल अहमद शेख यांच्यावर होता. कारण यापूर्वी ते कुर्बान हुसेन नगर येथे इसराइल शेख यांच्या घराजवळ राहण्यास होते. कुर्बान हुसेन नगर येथे इसराइल शेख याच्या घरी जाऊन चौकशी केली असता तोदेखील 12 डिसेंबर 2025 पासून घरी नसल्याचे समजले.
advertisement
कपाट उघडलं तर दागिने गायब
रुक्मिणी शिंदे यांनी 4 जानेवारी 2026 रोजी पाहुण्यांच्या घरी कार्यक्रम असल्याने सोन्याचे दागिने घालून जाण्यासाठी कपाट उघडले. तेव्हा त्यात सोन्याचे दीड तोळ्याचे गंठण, एक तोळ्याचे कानातील टॉप्स व झुबे नव्हते. तसेच सोयाबीन विकून आलेले 60 हजार रुपये रोख रक्कम देखील कपाटात दिसली नाही. रुक्मिणी यांनी पती संतोष यांना विचारले असता त्यांनी देखील कपाटातील लॉकरमध्ये ठेवले असल्याचे सांगितले.
advertisement
रुक्मिणीने लहान मुलगी श्रेयाला विचारले असता तिने सांगितले की 12 डिसेंबर 2025 रोजी 9 वाजण्याच्या सुमारास श्रुती दीदी कॉलेजला जात असताना लॉकर उघडून त्यामधील पैसे घेताना पाहिले होते. एवढे पैसे का घेतले आहे असे विचारले असता कॉलेजमधील फी भरायची आहे म्हणून सांगितले होते. तेव्हा मुलगी श्रुती हिनेच इसराइल शेख याच्या सांगण्यावरून कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, टॉप्स व झुबे जोड आणि 60 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची खात्री पटली.
advertisement
दरम्यान, रुक्मिणी संतोष शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगी श्रुती संतोष शिंदे व इसराइल अहमद शेख या दोघांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार लक्ष्मीकांत फुटाणे करत आहेत.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 10:13 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
लेकीचं भयानक कांड, आई थेट पोलिसांत, श्रुतीनं इसराईल सोबत..., सोलापुरातील घटनेनं खळबळ










