ब्रेकअपनंतर प्रियकराच्या मनधरणीसाठी केक घेऊन आली अन् फसली..., लोकांनी केली धुलाई, मालाडला काय घडलं?

Last Updated:

Mumbai News: काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेचे तिच्या प्रियकराशी ब्रेकअप झाले होते. मनधरणीसाठी ती केक घेऊन आली होती.

ब्रेकअपनंतर प्रियकराच्या मनधरणीसाठी केक घेऊन आली अन् फसली..., लोकांनी केली धुलाई, मालाडला काय घडलं?
ब्रेकअपनंतर प्रियकराच्या मनधरणीसाठी केक घेऊन आली अन् फसली..., लोकांनी केली धुलाई, मालाडला काय घडलं?
मुंबई: प्रियकरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर एक तरुणी मनधरणी करण्यासाठी केक घेऊन आली. मात्र, या केकमुळेच तिची धुलाई झाल्याचा खळबळजनक प्रकार मालवणी परिसरात घडला आहे. ‘मुले चोर’ असल्याच्या संशयातून एका निष्पाप महिलेला जमावाच्या मारहाणीला सामोरे जावे लागले. ही घटना 6 जानेवारी रोजी घडली असून, या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवांचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो, याचा धक्कादायक अनुभव मालवणी परिसरात पुन्हा एकदा आला आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेचे तिच्या प्रियकराशी ब्रेकअप झाले होते. पुन्हा एकदा त्याच्याशी संवाद साधून गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने ती त्याच्या घराजवळ गेली होती. मनधरणीसाठी ती केक घेऊन आली होती. मात्र प्रियकर घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तो केक परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांना दिला आणि तेथून निघून गेली.
advertisement
संशयातून मारहाण
प्रियकर घरी परतला असावा, या आशेने महिला पुन्हा त्या परिसरात आली. यावेळी आधी मुलांना केक दिलेली तीच महिला पुन्हा दिसल्याने काही नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला. सोशल मीडियावर पसरलेल्या ‘मुले चोर’ अफवांचा प्रभाव इतका होता की, कोणतीही खात्री न करता जमावाने तिला घेरले. चौकशीच्या नावाखाली तिच्यावर हात उचलण्यात आला आणि तिला मारहाण करण्यात आली.
advertisement
पोलिसांची तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेला जमावाच्या तावडीतून सोडवून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. कसून चौकशीनंतर ती महिला मुले चोरणारी नसून संपूर्ण प्रकार हा गैरसमजामुळे घडल्याचे स्पष्ट झाले.
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेनंतर मालवणी परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास स्वतः निर्णय न घेता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
ब्रेकअपनंतर प्रियकराच्या मनधरणीसाठी केक घेऊन आली अन् फसली..., लोकांनी केली धुलाई, मालाडला काय घडलं?
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement