पैशांना हातही नाही लावला, गॅस कटरने फोडले 22 लॉकर, सांगली जिल्हा बँकेत फिल्मी स्टाईल दरोडा!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत अज्ञात दरोडेखोरांनी २२ लॉकर फोडून ९ लाख ३० हजारांचे दागिने चोरले. पोलिसांचा तपास सुरू असून परिसरात खळबळ आहे.
आसिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली: एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमात शोभावा असाच काहीसा थरार आटपाडी तालुक्यातील झरे इथे घडला आहे. रात्रीचा किर्रर्र अंधार, हातामध्ये गॅस कटर आणि डोक्यात बँकेच्या तिजोरीचा नकाशा घेऊन आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झरे शाखेवर अक्षरशः डल्ला मारला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक आपल्या टीमसह शोध घेत आहेत. दरम्यान, बँकेचे लॉकरच फोडले गेल्यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये चिंतेचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पोलीस या 'फिल्मी' चोरांना गजाआड कधी करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










