कोकण फिरायचं? माघी गणेश जयंतीनिमित्त एसटीचे आयोजन; बसेस कुठून सुटणार? संपूर्ण माहिती वाचा
Last Updated:
Maghi Ganesh Jayanti : माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने एसटीच्या पालघर विभागाने कोकण दर्शन सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीत गणपतीपुळे, मुरुड-जंजिरा, रायगड आणि संगमेश्वर दर्शनाचा समावेश आहे.
पालघर : माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाने भाविक आणि पर्यटकांसाठी विशेष कोकण दर्शन सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीत कोकणातील प्रसिद्ध देवस्थाने तसेच ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घडवून आणले जाणार आहे.
माघी गणेश जयंतीनिमित्ताने कोकण फिरण्याची सुवर्णसंधी
पालघर, सफाळे, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर आणि नालासोपारा या आठ आगारांतून ही विशेष बससेवा उपलब्ध असणार आहे. कोणत्याही एका आगारातून जर 40 प्रवाशांचा गट तयार झाला तर त्यांच्यासाठी स्वतंत्र बस देण्याची तयारी एसटी प्रशासनाने दर्शवली आहे.
'या' ठिकाणी येता जाणार
या कोकण दर्शन सहलीत मुरुड-जंजिरा किल्ला आणि रायगड किल्ला या ऐतिहासिक दुर्गांचा समावेश आहे. तसेच संगमेश्वर, गुहेतील शिवमंदिर असलेले मार्लेश्वर आणि कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शन घडवले जाणार आहे. बसचा प्रवास मार्ग मुरुड-जंजिरा - माणगाव - रायगड - संगमेश्वर - मार्लेश्वर - गणपतीपुळे असा असणार असून त्यानंतर परतीचा प्रवास होणार आहे.
advertisement
या सहलीसाठी समूह नोंदणी करण्यात येणार असून एसटीच्या सर्व सवलती लागू राहतील. महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना तिकिट दरात 50 टक्के सवलत मिळणार आहे. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर 65 ते 75 वयोगटातील नागरिकांना 50टक्के सवलत दिली जाणार आहे.
येत्या 22 जानेवारी रोजी माघी गणेश जयंती असल्याने भाविकांना गणपतीपुळे येथे जाणे सुलभ व्हावे यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. या सहलीसाठी ठराविक कालावधीचे बंधन नसून प्रवाशांच्या मागणीनुसार तारीख आणि वेळ ठरवली जाणार आहे. पुढील काळात प्रतिसाद मिळाल्यास अष्टविनायक दर्शन पॅकेज टूर सुरू करण्याचा पालघर विभागाने व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 11:45 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
कोकण फिरायचं? माघी गणेश जयंतीनिमित्त एसटीचे आयोजन; बसेस कुठून सुटणार? संपूर्ण माहिती वाचा









