'कोणासोबत झोपायचं ही माझी मर्जी', हे काय बोलून गेली भारताची नंबर 1 हिरोईन? बोल्ड स्टेटमेंटची जगात चर्चा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
दीपिका पादुकोणने 'माय चॉईस' व्हिडिओत महिलांच्या निवडीच्या अधिकारावर ठाम मत मांडले, ज्यामुळे वाद झाला. ती रणवीर सिंहची पत्नी आणि 'दुआ'ची आई आहे.
मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी लग्न, नातेसंबंध आणि महिलांच्या अधिकारांवर दिलेले एक अत्यंत बोल्ड आणि थेट विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आज ती पत्नी आणि एका गोंडस मुलीची आई आहे, पण लग्नापूर्वी तिने दिलेले हे स्टेटमेंट अनेकांच्या भुवया उंचावून गेले होते.
advertisement
दीपिका पादुकोण तिच्या फिल्मी करिअरइतकीच तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत राहिली. कधी तिचे नाव क्रिकेटपटू युवराज सिंह किंवा एम एस धोनीसोबत जोडले गेले, तर अभिनेता रणबीर कपूरसोबतचे तिचे नाते तर जगजाहीर होते. या दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही आणि ब्रेकअपनंतर दीपिका खूप खचली होती, असे म्हटले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सर्वात महत्त्वाचे आणि ज्यामुळे मोठा वाद झाला, ते विधान करताना दीपिका म्हणाली होती, "लग्नाआधी कोणासोबत शारीरिक संबंध करायचे, लग्नानंतर करायचे की नाही करायचे, हे देखील माझ्यावर अवलंबून आहे." या 'बोल्ड' स्टेटमेंटनंतर समाजात दोन गट पडले. अनेकांनी दीपिकाला पाठिंबा दिला, तर अनेकांनी तिच्यावर तीव्र टीका केली.
advertisement
advertisement