Most Horror Series On OTT : सगळ्यात भयानक सीरिज, रात्री एकट्याने चुकूनही पाहू नका, एक-एक सीन पाहताना उडेल थरकाप

Last Updated:
Most Horror Series : हॉरर जॉनरने प्रेक्षकांना वेड लावले आहे. OTT वर प्रदर्शित झालेली एक हॉरर वेब सिरीज सध्या प्रचंड चर्चेत आहे, जी पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला आहे.
1/6
मुंबई: चित्रपट आणि ओटीटीच्या जगात वेगवेगळ्या कथांची स्पर्धा सुरू असताना, हॉरर जॉनरने प्रेक्षकांना वेड लावले आहे. प्राईम व्हिडीओ वर प्रदर्शित झालेली एक हॉरर वेब सिरीज सध्या प्रचंड चर्चेत आहे. या सिरीजचे नाव आहे 'खौफ', जी पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला आहे. जर तुम्ही खऱ्या हॉरर कथांचे शौकीन असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच!

advertisement
2/6
'खौफ' सिरीजची कथा दिल्लीतील एका गर्ल्स हॉस्टेलच्या '३३३ क्रमांकाच्या' खोलीभोवती फिरते. ग्वालियरमधून दिल्लीत शिकायला आलेल्या एका तरुणीला हॉस्टेलमध्ये हीच खोली मिळते. मात्र, ही खोली सैतानी शक्तींच्या छायेत आहे.

3/6
हळूहळू ती खोली या मुलीला आपल्या विळख्यात घेते. या मुलीचा एक भयानक भूतकाळ देखील आहे, जो सिरीजमध्ये मोठ्या कुशलतेने दाखवण्यात आला आहे. या खोलीत घडणाऱ्या भयानक घटना पाहून प्रेक्षकांच्या अक्षरशः तोंडचे पाणी पळते.

4/6
'खौफ' सिरीजचे लेखन स्मिता सिंह यांनी केले असून, पंकज कुमार आणि सूर्या बालाकृष्णन यांनी दिग्दर्शन केले आहे. या सिरीजमध्ये अनेक दमदार कलाकार दिसले आहेत. मुख्य भूमिकेत मोनिका पंवार, ज्येष्ठ अभिनेते रजत कपूर, गीतांजली कुलकर्णी, अभिषेक चौहान आणि शिल्पा शुक्ला अशा कलाकारांची फौज आहे.

5/6
विशेष म्हणजे, 'बिग बॉस १८' ची कंटेस्टेंट राहिलेली अभिनेत्री चुम दरांग हिनेही या सिरीजमध्ये एक महत्त्वाची आणि भयानक भूमिका साकारली आहे. मॅचबॉक्स शॉट्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या सिरीजमधील प्रत्येक ८ एपिसोड्समध्ये जबरदस्त ट्विस्ट आहेत.

6/6
'खौफ' सिरीजला IMDb वर ७.१ चे जबरदस्त रेटिंग मिळाले आहे, ज्यामुळे ती हॉरर चाहत्यांमध्ये आजही लोकप्रिय आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement