VIDEO : कर्णधारपदावरून काढल्यानंतर पहिल्यांदाच रोहित गंभीर एकत्र दिसले, काय चर्चा झाली?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.या फोटोमध्ये रोहितला कर्णधार पदावरून काढल्यानंतर पहिल्यांदाच तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत दिसला आहे. या फोटोची प्रचंड चर्चा रंगली आहे.
India vs Australia : येत्या 19 ऑक्टोबर 2025 ला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना खेळणार आहे.हा सामना पर्थच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याला अजून दोन दिवस उरले असल्याने टीम इंडिया सध्या मैदानात कसून प्रॅक्टीस करते. टीम इंडियाचा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आज अनेक तास फलंदाजीच्या प्रॅक्टीस केली.या प्रॅक्टीस दरम्यानचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत.अशात एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.या फोटोमध्ये रोहितला कर्णधार पदावरून काढल्यानंतर पहिल्यांदाच तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत दिसला आहे. या फोटोची प्रचंड चर्चा रंगली आहे.
खंर तर टीम इंडियाने आज संपूर्ण दिवस पर्थच्या मैदानावर प्रॅक्टीस केली. यावेळी संघाचे सर्वच सदस्य मैदानात उपस्थित होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आज मैदानात अनेक तास फलंदाजीची प्रॅक्टीस केली. विराट कोहलीने जास्त उसळी घेणाऱ्या बॉलची प्रॅक्टीस केली. तर रोहित शर्माने फुलर लेंथ बॉलवर प्रॅक्टीस केली. या दरम्यान गौतम गंभीरही मैदानात उपस्थित होता.
advertisement
Rohit Sharma & Gautam Gambhir having chat together in today's practice session. 🇮🇳 pic.twitter.com/SPyfopEmVx
— Tanuj (@ImTanujSingh) October 16, 2025
आता रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये गौतम गंभीर आणि रोहित शर्मामध्ये प्रॅक्टीस सेशन दरम्यान चर्चा करताना दिसत आहे. या फोटोमधील रोहित शर्माची रिअॅक्शन पाहण्यासारखी.त्याचसोबत या फोटोवरून नेटकरी कमेंटचा पाऊस देखील पाडतायत.
advertisement
✅ Touchdown Perth
✅ Hit the nets
✅ No cars damaged (IYKYK 😂)@ImRo45 is all set to get things rolling Down Under! 🔥#AUSvIND 👉 1st ODI | SUN, 19th OCT, 8 AM! pic.twitter.com/SBxjadYHcZ
— Star Sports (@StarSportsIndia) October 16, 2025
advertisement
खरं तर रोहित शर्माला वनडेच्या कर्णधार पदावर कायम राहायचे होते. कारण त्याचे 2027 चा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न होते. पण रोहित शर्माला कर्णधार पदावरून पाय उतार होण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. आणि त्याच्या जागी शुभमन गिलला वनडेचा कर्णधार बनवण्यात आले होते. विशेष म्हणजे या सर्व घडामोडीवर रोहित शर्माने मौन बाळगले आहे.त्यामुळे या गोष्टीवरून रोहित गंभीर आणि निवड समितीवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात हा फोटो व्हायरल झाल्याने रोहित गंभीरवर किती नाराज आहे? हे या फोटोवरून स्पष्ट होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 9:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : कर्णधारपदावरून काढल्यानंतर पहिल्यांदाच रोहित गंभीर एकत्र दिसले, काय चर्चा झाली?