बांगलादेशला चिरडून ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये, टीम इंडियाचं काय होणार? पॉईंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
बांगलादेशने दिलेलं 199 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 24.5 ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता पार केलं आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाने महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
विशाखापट्टमण : बांगलादेशने दिलेलं 199 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 24.5 ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता पार केलं आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाने महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी ऑस्ट्रेलिया पहिली टीम ठरली आहे. भारताविरुद्ध शतक करणाऱ्या ऍलिसा हिलीने बांगलादेशविरुद्धही शतक झळकावलं आहे. हिलीने 77 बॉलमध्ये नाबाद 113 रन केले. हिलीच्या या खेळीमध्ये 20 फोरचा समावेश होता. तर फोबे लिचफिल्डने 72 बॉलमध्ये नाबाद 84 रन केले, ज्यात 12 फोर आणि 1 सिक्स होती.
या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर त्यांना 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 198 रन करता आले. ऑस्ट्रेलियाकडून गार्डनर, सदरलँड, किंग आणि वारेहाम यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, याशिवाय मेगन शुटला 1 विकेट घेण्यात यश आलं. बांगलादेशकडून सोभाना मोस्त्रीने नाबाद 66 आणि रुबिया हैदरने 44 रनची खेळी केली. बांगलादेशच्या 7 बॅटरना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.
advertisement
सेमी फायनलच्या रेसमध्ये ड्रामा
या विजयासोबतच ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम आहे. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांमध्ये 4 मॅच जिंकल्या आहेत, तर त्यांचा एक सामना रद्द झाला आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 9 पॉईंट्स आहेत. 4 सामन्यात 3 विजय आणि एक रद्द सामन्यासह इंग्लंडचे 7 पॉईंट्स आहेत, त्यामुळे आणखी एका विजयासह इंग्लंडची टीमही सेमी फायनलमध्ये पोहोचेल.
advertisement
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात 6 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. 4 मॅचमध्ये 2 विजय आणि 2 पराभवांसह टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने 4 पैकी 1 सामना जिंकला असून 2 सामन्यात त्यांचा पराभव झाला आणि त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे किवी टीम पाचव्या क्रमांकावर आहे.
advertisement
सध्याच्या पॉईंट्स टेबलची स्थिती पाहिली तर ऑस्ट्रेलियासह इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता सर्वाधिक आहे, तर चौथ्या स्थानासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रेस आहे. भारताचे उरलेले तीन सामने हे इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध आहेत, त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन मात्र वाढलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा विक्रम
महिला क्रिकेटच्या इतिहासात एकही विकेट न गमावता यशस्वी पाठलाग करतानाची ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या होती. याआधी ऑस्ट्रेलियाच्याच महिला टीमने 2023 साली आयर्लंडविरुद्ध 218 रनचा पाठलाग केला होता. तसंच हिली आणि लिचफिल्डची नाबाद 202 रनची ही पार्टनरशीप महिला वर्ल्ड कपमधली ऑस्ट्रेलियाची तिसरी सगळ्यात मोठी पार्टनरशीप आहे. तसंच महिला वर्ल्ड कपमध्ये लागोपाठ दोन सामन्यात दोन शतकं करण्याचा विक्रम हिलीने दुसऱ्यांदा केला आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि बांगलादेशविरुद्ध तर 2022 च्या वर्ल्ड कपमध्येही हिलीने लागोपाठ 2 सामन्यांमध्ये 2 शतकं केली होती.
view commentsLocation :
Visakhapatnam,Andhra Pradesh
First Published :
October 16, 2025 9:58 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बांगलादेशला चिरडून ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये, टीम इंडियाचं काय होणार? पॉईंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट!