Vasubaras Photo : वसुबारसला Whatsapp DP, Status, Instagram Story वर ठेवण्यासाठी गायीचे सुंदर फोटो

Last Updated:
Vasubaras Cow Images : दिवाळीची सुरुवात वसुबारस सण. यासाठी तुम्ही व्हॉटसअप डीपी, स्टेटस, फेसबुक पोस्ट, इन्स्टाग्राम स्टोरीसाठी गायीचे फोटो शोधत असाल. तर आम्ही तुमच्यासाठी सुंदर असे फोटो आणले आहेत.
1/9
आश्विन कृष्ण द्वादशी या दिवसाला वसुबारस म्हणतात. दिवाळीच्या सुरुवातीला साजरा होणारा वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी हा सण म्हणजेच या गोमातेच्या पूजनाचे प्रतीक आहे.

advertisement
2/9
17 ऑक्टोबरला पहिला दिवाळीचा दिवा लागणार असून  वसुबारस साजरा केला जाईल. या दिवशी गाई आणि तिच्या वत्साचे (वासराचे) पूजन करून मानव आणि निसर्गातील नात्याचा आदर केला जातो.

3/9
गोवत्स द्वादशी या सणाचे मूळ संस्कृतात आहे. गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे वासरू. या दिवशी गाई-वासराचे पूजन केल्याने पापांचा नाश होतो, आयुष्य निरोगी राहते आणि घरात सुख-समाधान नांदते, असा विश्वास आहे.

4/9
पुराणांनुसार, गाईच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास आहे. म्हणून गाईला विश्वाची माता असंही संबोधलं जातं. गोधनपूजनाच्या वेळी जीवो जीवस्य जीवनम् या तत्वाचा प्रत्यय येतो.

5/9
गाई ही केवळ धार्मिक प्रतीक नसून आर्थिक, पर्यावरणीय आणि आरोग्यदायी समृद्धीची जननी आहे. तिच्या शेण-गोमुत्राचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करणं म्हणजे शाश्वत आणि संतुलित विकासाचा मार्ग स्वीकारणं होय.

6/9
वसुबारसच्या दिवशी गोमातेचे पूजन करताना भारतीय संस्कृती आपल्याला एकच संदेश देते, निसर्गाशी सुसंवाद ठेवा, तोच खरा उत्सवाचा आनंद आहे.

7/9
या दिवशी घरातील स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या, मुलांच्या कल्याणासाठी गायीची पूजा करतात. तिला नैवेद्य खाऊ घालतात.

8/9
वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तयार व्हावे. त्यानंतर दारात रांगोळी काढून आणि तोरण बांधून अंगण सुशोभित करावे. त्यानंतर गायीच्या पायावर पाणी घालतात आणि नंतर हळद-कुंकू, अक्षता वाहून गायीचे औक्षण करतात आणि नंतर नैवेद्य दाखवतात. गुरं नसतील तर गायी-वासराची मूर्ती किंवा फोटोला पुजावं. शहरी भागात गायीच्या मूर्तीची पूजा केली जाते. 

9/9
उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. तर काही ठिकाणी गायीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले आणि तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत, अशी मान्यता आहे.बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडावा.  

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement