Bigg Boss Marathi 6 ची मोठी अपडेट समोर, ही असणार यंदाची ऑफिशियल थीम, हे अतरंगी सदस्य गाजवणार यंदाचा खेळ
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bigg Boss Marathi Season 6 : 'बिग बॉस मराठी सीझन 6'ची ऑफिशियल थीम काय? कोणते अतरंगी सदस्य यंदाचा सीझन गाजवणार? तसेच यंदाच्या सीझनमध्ये काय वेगळं पाहायला मिळणार हे आता समोर आलं आहे.
advertisement
'बिग बॉस मराठी सीझन 6'च्या नव्या सीझनची नवी थीम काय असणार? हे जाणून घेण्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. कारण या थीमवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. या खेळाचा गेम अवलंबून असतो, स्पर्धकांची वाटचाल अवलंबून असते. त्यांचे नॉमिनेशन अवलंबून असतात. कॅप्टनशिप अवलंबून असते. शिक्षा, टास्क अशा सगळ्या गोष्टी थीमवर अवलंबून असतात.
advertisement
'बिग बॉस मराठी 6'ची यंदाची थीम ही 'बिग बॉस'च्या हिंदी सीझनमधून घेण्यात आली आहे. 'स्वर्ग आणि नरक'. यामध्ये बरेच दरवाजे पाहायला मिळतील. पण सेंटर पॉईंट हा महाद्वार असणार आहे आणि या महाद्वारातून आतमध्ये प्रवेश करणं आणि मग स्वर्ग आणि नरक पार करुन 'बिग बॉस'च्या घरात जाणं अशी एकूणच थीम ठरवण्यात आली आहे.
advertisement
advertisement
रितेश देशमुखचा एक आगळावेगळा भाव, स्वभाव आणि न दिसलेली बाजू 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण रितेश भाऊ स्वत: म्हणत आहेत,"मागचा सीझन वाजवला होता हा सीझन गाजवायचा आहे". रितेश देशमुखला आता प्रेक्षकांची आवड-निवड कळली आहे. त्यामुळे या सीझनमध्ये रितेश देशमुखची मसालेदार होस्टिंग पाहायला मिळणार आहे.
advertisement
'बिग बॉस मराठी 6'च्या माध्यमातून प्रेक्षकांना 100 दिवस एन्टरटेनमेंटची मेजवानी मिळणार आहे. 1 घर, 16-17 स्पर्धक, 1 दमदार होस्ट, वेगवेगळे टास्क, प्रत्येक आठवड्याला घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकाची धाकधूक, होणारी भांडण, एकमेकांवर करण्यात येणारे आरोप आणि बाहेरच्या रिअॅक्शन या सगळ्या गोष्टींची एकत्रित मेजवानी 'बिग बॉस मराठी 6'मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
advertisement
'बिग बॉस मराठी'च्या खेळातले सदस्य हे त्या खेळातले जीव असतात. स्पर्धकच सीझन गाजवत असतात. यंदाच्या सीझनमध्येही थीमला साजेसे स्पर्धक निवडण्यात आले आहेत. यंदाच्या सीझनमध्ये तरुण स्पर्धक 99 टक्के पाहायला मिळणार आहेत. कलाकार मंडळी, रीलस्टार, युट्यूबर आणि स्पोर्ट्स कॅटेगरीमधले स्पर्धक यंदा पाहायला मिळणार आहेत. तरुणांचं पर्व म्हणून सहावा सीझन ओळखला जाईल.
advertisement
advertisement
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनच्या संभाव्या स्पर्धकांमध्ये गिरीजा ओक, रसिका सुनील, ईशा केसकर, जयवंत वाडकर, विजय पाटकर, समीर परांजपे, गौरव मोरे, अंशुमन विचारे, रोहित राऊत, डॅनी पंडित, अनुश्री माने, अर्थव रुके, गौतमी पाटील, गुणरत्न सदावर्ते, नागेश मडके, रवी काळे, लक्ष्मण भोसले या स्पर्धकांचा समावेश आहे.









