नाशिक जिल्ह्यातल्या ११ नगर परिषदेत भाजप-शिंदेसेना सुस्साट, विरोधकांचं पानिपत, वाचा निकाल
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
local body election 2025 : जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांनी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. जिल्ह्यातील एकूण ११ नगरपरिषदांसाठी २ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यांत शांततेत मतदान पार पडले.
नाशिक : जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांनी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. जिल्ह्यातील एकूण ११ नगरपरिषदांसाठी २ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यांत शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी तब्बल ५३ उमेदवारांनी दावेदारी केली असून, नगरसेवकपदाच्या २६४ जागांसाठी हजाराहून अधिक इच्छुकांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
advertisement
आज, २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीमुळे या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. कोणत्या पक्षाला जनतेचा कौल मिळतो, कोणते प्रस्थापित गड कोसळतात आणि कुठे नवी नेतृत्वे उदयास येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण बाजी मारतो आणि अखेर “नगराचा नवा बादशहा” कोण ठरतो, याची उत्कंठा राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.
advertisement
कोण आघाडीवर?
1.भगूर - अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
2.पिंपळगाव बसवंत - भाजपचे डॉ. मनोज बर्डे आघाडीवर
3.सिन्नर - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले आघाडीवर
4.ओझर - भाजपच्या अनिता घेगडमल आघाडीवर
advertisement
5.त्र्यंबकेश्वर - भाजपचे कैलास घुले आघाडीवर
6 इगतपुरी - शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे आघाडीवर
7.येवला - शिंदे सेनेचे रुपेश दराडे आघाडीवर
8.मनमाड - शिंदेंच्या शिवसेनेचे बबलू पाटील आघाडीवर
9.नांदगाव - शिंदे सेनेच्या सागर हिरे आघाडीवर
advertisement
10.सटाणा - शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील आघाडीवर
11.चांदवड - भाजपचे वैभव बागुल आघाडीवर
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 11:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिक जिल्ह्यातल्या ११ नगर परिषदेत भाजप-शिंदेसेना सुस्साट, विरोधकांचं पानिपत, वाचा निकाल









